
ड्रग्स माफिया ललित पाटील याच्या आईचा गौप्यस्फोट पाया पडून एवढीच विनंती कीय?
नाशिक | ड्रग्स माफिया ललित पाटील याला चेन्नईतून अटक करण्यात आली आहे. तब्बल 15 दिवस पोलिसांना गुंगारा देत ललित फिरत होता. अखेर त्याला मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी 10 पथकेही तयार केली होती. आता त्याच्या अटकेने ड्रग्स प्रकरणात अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ललित पाटील चौकशीत काय माहिती देतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ललितला अटक झाल्यानंतर त्याच्या आईने मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ललितचा एन्काऊंटर करू नका, एवढीच विनंती करते, असं आवाहन पोलिसांना केलं आहे.Live Cricket
Live Share Market
