
या’ महिन्यात लागणार लोकसभेची आचारसंहिता, मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान
नागपूर | : विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसाचं कामकाज आटोपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एकत्रित पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणावर भूमिका मांडली. मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन घेतलं जाईल, अशी घोषणा सभागृहात केली. मागासवर्ग आयोगाचा अहवाल पुढच्या महिन्यात येणार आहे. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात सरकार विशेष अधिवेशन बोलवेल, असं शिंदे सभागृहात म्हणाले. पण फेब्रुवारीत लोकसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागली तर मग काय? अशी चर्चा सध्या सुरुय. याबाबत एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी भूमिका मांडली.“नागपूरच्या अधिवेशनाच्या काळात थंडी पडली आहे. सर्वसामान्य जनतेचं भलं होणार आहे. विरोधकांनी विदर्भाचा एकही प्रस्ताव आणला नाही असे हे एकमेव अधिवेशन आहे. ही खेदजनक आणि आश्चर्याची बाबा आहे. त्यांनी विदर्भाचा मुद्दा घेतला नाही तरी आम्ही हा विषय चर्चेला आणला. विदर्भातील आज 29 सिंचन प्रकल्पांना मान्यता दिलीय. 6 हजार कोटी रुपये विदर्भातील प्रकल्पाला दिले”, असं फडणवीस म्हणाले.



