
आता कांद्याने पुन्हा वांदा केला कांदा ग्राहकांना रडवणार, कांदा दरवाढीमागील कारण काय?
नाशिक | कांदा हे सर्वात बेभरवशाचे पीक आहे. मिळणार नाही. त्याचवेळी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कांद्याचे दर वाढत असल्यामुळे ग्राहकांच्या डोळ्यात अश्रू येणार आहेत.नाशिक जिल्हा कांद्याच्या उत्पादनासाठी देशभर प्रसिद्ध आहे. नाशिकमधील कांदा देशातच नाही तर परदेशातही जात असतो. लासलगावमधील कांद्याची बाजारपेठ आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. परंतु आता आवक घटल्यामुळे कांदा भावात तेजी आली आहे. नाशिकमधील किरकोळ बाजारात कांदा 50 ते 70 रुपये किलोने विकला जात आहे. साठवणुकीतील कांदा सडल्यामुळे बाजारात कांद्याची आवक कमी झाली आहे. त्याचा परिणाम दरवाढीवर झाला आहे.कधी होणार कांद्याचे दर स्थिर
सध्या कांद्याचे दर वाढले आहे. परंतु नवीन लाल कांदा येण्यास अजून महिनाभराचा कालावधी लागणार आहे. यामुळे आणखी काही दिवस भाव तेजीत राहण्याची शक्यता आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कांद्याचे दर वाढल्यामुळे ग्राहकांना जादा दर मोजावे लागत आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर कांदा सर्वसामान्यांना रडवणार आहे
Live Cricket
Live Share Market
