
विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले?
राऊतांच्या विधानावर म्हणाले…

अजून चर्चेची पहिली फेरी झालेली ही नाही. तरी अशा वावड्या उठत आहेत. जागा वाटपाचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार केंद्रीय समितीला आहे. राज्यातील नेत्यांना नाही. संजय राऊत 23 जागा लढवणार असे म्हणाले. मात्र त्यांच्या वक्तव्याचा खंडण आम्ही का करायचं? किती जागा काँग्रेस लढेल याचा निर्णय आमचं हाय कमांड करेल, असंही वडेट्टीवार म्हणाले.
आरक्षणावर वडेट्टीवार म्हणाले…
मराठा आरक्षणाचा वाद महायुतीचे सरकारने निर्माण केला आहे. सरकारने जरांगेना आश्वासन द्यायचं नव्हतं? का शिष्टमंडळ घेऊन भेटायला गेले.. आता जेव्हा भेटले आहात तर शब्द पूर्ण करा.. हा पाप महाराष्ट्र सरकारचा आहे त्यामुळे त्याचा प्रायश्चित करावा लागणार आहे.. या अधिवेशनातून अपेक्षा होती.. मात्र कुठलाच निर्णय झालेला नाही.. याचाच अर्थ आहे की सरकार निर्णय घेऊ शकत नाही आणि जेव्हा निर्णय घेऊ शकत नाही तेव्हा का आश्वासन देता, असं वडेट्टीवार म्हणालेत.



