
पिपल्स रिपब्लिकन पार्टी व बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत युती
पिपल्स रिपब्लिकन पार्टी व बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत युती
जोगेंद्र कवाडे यांच्या पिपल्स रिपब्लिकन पार्टी यांच्या पक्षानं बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत युती करण्याचा
निर्णय घेतला. अशी आज भूमिका जाहीर केली आहे. संघर्षातून पुढं आलेले दोन्ही पक्ष आहेत, हे सामान्य लोकांचं सरकार आहे अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. दोन्ही पक्षांचा संघर्ष साधा-सोपा नव्हता. कवाडे हे सुशिक्षित व अभ्यासू नेता आहेत. त्यांच्या आंदोलनाच्या काळात लोकांना न्याय देण्याची भूमिका घेतली. एकेकाळी कवाडे यांच्या भाषणांवर बंदी होती. यावरून किती आक्रमकतेने ते विषय मांडत हे लक्षात येते. लोकांच्या अन्यायाला न्याय देण्याचं काम ते करायचे. त्यांची आक्रमकता भल्याभल्यांना घाम फोडायची, असंही शिंदे यांनी सांगितलं.
9 लाख रुपयांना व्याजाच्या नावाखाली तब्बल 51 लाखांना लुट
नाशिक : सावकराच्या त्रासाला कंटाळून एका दांपत्याने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतांना मुंबई नाका पोलीस ठाण्यात एका खासगी सावकारीच्या संदर्भात गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे, विशेष म्हणजे या गुन्ह्यात अवघ्या 9 लाख रुपयांना व्याजाच्या नावाखाली तब्बल 51 लाखांना लुटल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मुंबई नाक पोलीस ठाण्यात तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाल्याने या गुन्ह्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सुरेश पुजारी या हॉटेल व्यावसायिकाने खाजगी सावकार असलेल्या विजय शंकर देशमुख यांच्याकडून पाच टक्के दराने कर्ज घेतले होते. त्यानुसार हॉटेल व्यावसायिक सुरेश पुजारी यांनी व्याजाच्या रकमेसह 50 लाख 90 हजार रक्कम देशमुख यांना परत केली होती. मात्र इतकी मोठी रक्कम परत करूनही देशमुख यांनी 20 लाख रुपयांची मागणी केली आहे. वारंवार पैशांचा तगादा लावून जीवे ठार मारण्याची धमकी देशमुख यांनी दिली आहे. त्यांच्या मुलीलाही शिवीगाळ केल्याचा प्रकार घडल्याचे पोलीसांत दिलेल्या तक्रारी म्हंटले आहे.


