
पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाचा गैरवापर करून तरूणीला फसवलं,
तिने पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, 6 नोव्हेंबर रोजी ती कामानिमित्त कंपनीत आली होती. 7 तारखेला दुपारच्या सुमारास तिला एक कॉल आला. आपण इंटरनॅशनल कुरियरच्या कार्यालयातून बोलत असल्याचे फोनवरील व्यक्तीने सांगितले. आधार कार्डच्या गैरवापराबाबत तक्रार करण्यात आली आहे, असे त्याने नमूद केले. त्यानंतर संशयित आरोपीने पुन्हा फोन केला आणि आपण सायबर कार्यालयातून बोलत असल्याचे सांगत ओळखपत्र पाठवले. बँकेत किती खाती आहेत, याची चौकशी केली. तसेच एक कोड पाठवून काही रक्कम पाठवल्यास बँक खात्यातील रक्कम कायदेशीर आहे की नाही ते कळवू असे सांगत तिच्याकडून पैसे उकळले. असे करत-करत विविध कॉलच्या माध्यमातून तिच्याकडील सुमारे 5 लाख आरोपीने लुटले रात्री तिने पतीला घडलेला सर्व प्रकार सांगितल्यावर, कोणताही अधिकारी असा पैसे पाठवायला सागत नाही, असे त्याने स्पष्ट केले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले आणि त्या तरूणीने वनराई पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. त्याआधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू केला आहे.


