कुंभार पुऱ्याला ” महात्मा बसवेश्वर नगर नामकरण.

 19/3/2023 ला काटोल नगरी विकासाचे महामेरू माननीय श्री चरणसिंगजी ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली शनिचौक येथील कुंभार पुऱ्याला ” महात्मा बसवेश्वर नगर ” असे नामकरण करून नगर परिषद काटोल च्या वतीने फलक अनावरण करण्यात आले., यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री दिनेश भाऊ ठाकरे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती काटोल, मा.श्री हेमराज भाऊ रेवतकर, माजी उपाध्यक्ष नगर परिषद काटोल, मा. श्री किशोर भाऊ गाढवे, मा.श्री राजूभाऊ चरडे, मा.श्री आशिष भाऊ जयस्वाल, मा. सौ शालिनीताई बनसोड,मा. श्री किशोर भाऊ सावरकर, मा. श्री राजेश भाऊ सरोदे, मा. श्री दिलीप भाऊ सुतोने, इत्यादी मान्यवर मंचकावर उपस्थित होते, यावेळी माननीय श्री चरण सिंग ठाकूर यांनी काटोलातील विविध विषयावर मार्गदर्शन करून,काटोलतील लिंगायत मठ निर्माण,लिंगायत समशान भूमी व महात्मा बसवेश्वर चा अर्धा कृती पुतळा स्थापन करू, व नामपलका जवळील परिसर विद्युतमय करू असे आश्वासित केले. शक्य ती मदत करू असे बोलून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली, तसेच माननीय दिनेश भाऊ ठाकरे व हेमराज भाऊ रेवतकर यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या विषयी अभ्यासपूर्ण भाषण व मार्गदर्शन करून उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ भावनाताई मांदळे यांनी करून, प्रास्ताविक अविनाश भाऊ मेनकुदळे तर आभार प्रदर्शन राजेश भाऊ दर्यापूरकर यांनी केले.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close