
वाढोणा ग्रामपंचायत मध्ये भूमिगत नाल्याचे काम निकृष्ट
वाढोणा ग्रामपंचायत मध्ये भूमिगत नाल्याचे काम निकृष्ट
–
काटोल तालुक्यातील वाढोणा ग्रामपंचायत मध्ये भूमिगत नालीचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात येत असल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य विकास पडोलिया यांनी केली आहे. सविस्तर वृत्त असे की 25 दिवसा पासून वाढोणा गावाच्या मुख्य रोडवरून भूमिगत नालीचे काम सुरू आहे .सुरू असलेल्या भूमिगत नालीचे काम इस्टिमेट नुसार करण्यात येत नसून ठेकेदार यांच्या मर्जीनुसार सुरू आहे. या भूमिगत नालीचे काम दहा लक्ष रुपयांच्या निधी खर्च करून ग्रामवाशीच्या सुविधेकरिता नालीचे काम करण्यात येत आहे. पण ठेकेदार यांनी राजकीय मंडळीच्या आशीर्वादाने थातूरमातूर काम करून मोकळे होण्याच्या मार्गावर असल्याची ग्रामवाशी ओरड करीत आहे . नालीचे काम दिरंगाने सुरू असून नालीचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. तरी नागरिकांच्या तोंडी तक्रारीवर आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी पंचायत समिती कडे केलेली तक्रार याच्यावर दखल अधिकारी यांनी घेतलेली नाही तसेच विकास पाडोलीया यांनी ग्रामसेवक यांना वारंवार काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर सुद्धा सचिव ग्रामपंचायत सदस्याच्या तक्रारीवर दाखल न घेता ठेकेदार यांना मदत करीत आहे. भूमिगत नाली मध्ये मातीत पायल्या टाकण्यात आलेल्या असून वापरण्यात आलेल्या पायल्या फुटक्या आणि तुटल्या आणि ते लेव्हलनुसार टाकण्यात आल्या नाही. सिमेंटचा वापर अल्प प्रमाणात करण्यात आलेला असून नालीचे काम इस्टिमेट नुसार करण्यात आले नसल्याची तक्रार ग्रामवाशियानी केली आहे .त्यामुळे अभियंता यांनी वाढोणा ग्रामपंचात येथे करण्यात आलेल्या भूमिगत नालीच्या कामाची चौकशी करून इस्टिमेट नुसार काम करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य विकास पाडोलीया यांनी केली आहे.



