
संविधान दिन कार्यक्रम संपन्न २]चिचोली व रिंगणाबोडी गावात लालपरी
जि.प.स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यास केंद्र, काटोल च्या वतीने
संविधान दिन कार्यक्रम संपन्न
भारतीय संविधान सर्वात मोठा ग्रंथ – पं.स.सभापती संजय डांगोरे
तालुका प्रतिनिधी/२७ नोव्हेंबर
काटोल – माणसाला माणसासारखे
जगण्याचा अधिकार भारतीय संविधानाने सर्व मानव जातीला दिला.संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांचा वापर करून देशातील प्रत्येक व्यक्ती चांगले जीवन जगू शकते. म्हणून भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठा ग्रंथ आहे असे प्रतिपादन पंचायत समिती सभापती संजय डांगोरे यांनी ‘संविधान दिन’ कार्यक्रमात जि.प.स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यास केंद्र, काटोल येथे केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती संजय डांगोरे, वक्ता म्हणून महात्मा फुले अभ्यासिकाचे संचालक प्रा.विवेक गायकवाड व सामाजिक कार्यकर्त्या इंजि.रंजनाताई सुरजूसे तर प्रमुख अतिथी म्हणून पं.स.सदस्या चंदाताई देव्हारे, गटशिक्षणाधिकारी संतोष सोनटक्के, शिक्षण विस्तार अधिकारी नरेश भोयर, केंद्रसमन्वयक राजेंद्र टेकाडे, आदिवासी वसतिगृह अधिक्षक प्रमोद खंडारे, केंद्रसमन्वयक एकनाथ खजुरीया प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी, वक्ते प्रा.विवेक गायकवाड म्हणाले,भारतीय संविधानाने देशातील जाती,धर्म,पंथ यातील भेदाभेद नष्ट केले.सर्वसामान्य व्यक्तीच्या जीवनात समता व समानता आणण्याचे कार्य राज्यघटनेने केले आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेच्या मसुदा तयार करतांना समाजातील सर्वात शेवटचा दलित,दुर्बल व शोषित घटक डोळ्यासमोर ठेवला होता.
यावेळी, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ परीक्षेत यश संपादन केलेल्या रितेश तरासे तसेच संविधान सामान्य ज्ञान स्पर्धेत सर्वाधिक गुण प्राप्त करणारे अमित बांबल, अक्षय कावटे व अश्विनी गाढवे यांचा गौरवचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी अभ्यास केंद्रातील विद्यार्थी रोशन धोत्रे व अमित बांबल यांनी संविधनाबाबत भाषण दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरेश भोयर, संचालन गुंजन रिठे तर आभार प्रदर्शन राजेंद्र टेकाडे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संगणक परिचालक सतिश बागडे, मार्गदर्शक कपिल आंबूडरे, परिचारिका अनुसया रेवतकर, सुरक्षा रक्षक रविंद्र पडोळे यांनी अथक परिश्रम घेतले.
चिचोली व रिंगणाबोडी गावात लालपरी
काटोल तालुक्यातील चिचोली गावात प्रथमच एस.टी.बस25 नोहेबर ला सुरु करण्यात आली या बस मध्ये नागपुर जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले , काटोल पंचायत समितीचे सभापति संजय डांगोरे,रा.यु.काँग्रेस चे महासचिव नितीन ठवळे, गणेश सावरकर, यांनी बस क्रमांक MH 07 C 9470 मधून प्रवास केला .बस चे चिचोली व रिंगणाबोडी येथे आगमन होताच तेथील स्थानिक नागरिक, विद्यार्थी यांनी आनंदोत्सव साजरा केला.व स्वागत केले.यावेळी बस चालक भुपेश वानखेडे तसेच वाहक सोनु शेरकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला, याप्रसंगी रिंगणाबोडी येथील सरपंच मंगला काळबांडे,पोलीस पाटील संजय नागपुरे,अनिल नागपुरे, रवि साठे,धनराज ढोबळे,अंबादास युवनाते,सुभाष ढोबळे,मारोतराव साठे, राजु कंगाले,मनोहर कुसराम,मुकुंदराव काळे,गजानन ढोबळे,सतीश पुंजे,कैलास, कीस्मत चव्हाण,तसेच दोन्ही गावातील नागरिक, विद्यार्थी,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते..
