सासू- सुनेला बोलली ‘तू नकटी आहेस’…? सुनेने केला सरळ चाकू हल्ला

 पुणे | संध्या अशोक मगर (वय ४५, रा. गणेश नगर, येरवडा) यांची मालनबाई परशुराम मगर (वय ७५) या सासू आहेत. मगर कुटुंब येरवडा येथील गणेश नगरमध्ये राहतात. एकाच घरात राहत असल्यामुळे कधी कधी त्यांच्यात सासू-सुनेमधील भांडणासारखा प्रकार होतो. परंतु नुकताच धक्कादायक प्रकार घडला. या दोघी घरामध्ये असताना संध्या ही मालनबाई यांना ‘तू नकटी आहेस’ असे बोलली. त्यावर मालनबाई यांनी सुद्धा चिडून तिला ‘तू पण नकटीच आहेस’ असे म्हटले. आपणास नकटी म्हटल्याचा संध्या मगर यांना प्रचंड राग आला. तिने सासूबाईंना शिवीगाळ सुरु केली. त्यानंतर हा प्रकार मारहाणपर्यंत गेला. त्यावेळी संध्या हिच्या हातामध्ये कांदा कापण्याची सुरी होती. तिच्याने हल्ला करत तिने मालनबाई यांना गंभीर जखमी केले. मालनाबाई यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी सासू मालनबाई हिने दिलेल्या फिर्यादीवरुन सुनेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासू-सुनेमधील या प्रकारानंतर परिसरातील अनेकांना धक्का बसला आहे.
Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close