
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
आम्ही त्यांना 40 दिवस दिले.
पंढरपूर | 21 ऑक्टोबर 2023 : आरक्षण देण्यासाठी सरकारने आपल्याकडे 30 दिवस मागितले. आम्ही त्यांना 40 दिवस दिले. त्यांना आश्चर्य वाटलं. एवढे दिवस दिलेच कसे? आपण त्यांना मुद्दाम 40 दिवस दिले. कारण त्यांना बहाणा हवा होता. त्यांनी आरक्षण दिलं असतं आणि ते टिकलं नसतं तर तुम्ही वेळ दिला नाही. त्यामुळेच आरक्षण टिकलं नाही असं सांगून आरक्षण न देण्याचा सरकारचा डाव होता. पण आपण त्यांना 30 ऐवजी 40 दिवस दिले आणि त्यांचा डाव उधळून लावला, असं सांगतानाच आता सरकारने वळवळ करू नये. अजून एक दोन दिवस वाढवून मागितलं जाईल. पण एक दोन दिवस तर काय एक घंटाही मिळणार नाही. आरक्षण द्यावंच लागेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.मनोज जरांगे पाटील यांची आज अकलूज येथे भव्य सभा पार पडली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर घणाघाती हल्ला चढवला. मी कामाला लागलोय. शब्द देतो आरक्षण मिळेपर्यंत एक इंचही आम्ही मागे हटणार नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं. तुमचा मतलब आरक्षणाशी आहे. कसंही मिळो. मलाही कसंही मिळो,आरक्षण घेऊच. शांततेच्या आंदोलनानं आरक्षण घेऊ. निर्णयाच्या प्रक्रियेपर्यंत आलो आहोत. सरकारच्या टेबलवर तेवढीच फाईल आहे. दुसरं कामच नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं.
Live Cricket
Live Share Market
