एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून दोघे दोस्त ट्रॅकवरून चालत होते आणि क्षणातच ..

मुंबई |   एक दुर्घटना (accident) पालघरजवळ घडली आहे.तेथे रेल्वे इंजिनची धडक बसून एका तरुणाचा मृत्यू तर आणखी एक तरूण गंभीर जखमी झाला आहे. पालघर रेल्वे स्थानकामध्ये हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. जखमी तरूणावर वापी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दोघे दोस्त एकत्र चालत होते अन् अचानकपालघर रेल्वे स्थानकातील नवली फाटकाच्या दरम्यान दोन तरुण मित्र एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून ट्रॅकवरून चालत होते. बऱ्याच दिवसांनी निवांत गप्पा मारत होते. मात्र त्यांच्या गप्पांमध्ये ते एवढे गुंग झाले की मागून येणाऱ्या ट्रेनबद्दलही त्यांना समजलं नाही. रेल्वेच्या मोटरमनने हॉर्न वाजवून ट्रॅकवर चालणाऱ्या त्या दोघांना सावध करण्याचाही प्रयत्न केला. मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. अखेर रेल्वे इंजिनची त्या दोघांना जोरदार धडक बसली. यामध्ये ते दोघेही गंभीर जखमी होऊन कोसळले. त्यापैकी एका तरूणाचा तेथेच मृत्यू झाल. तर दुसऱ्या जखमी तरूणाला उपचारांसाठी पालघर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर त्याला वापी येथील रुग्णालयात हलवण्यात आले
Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close