
नागपूर जिल्ह्यात दिग्गजांना फटका तर जिल्हा भाजपम्य
नागपूर जिल्ह्यात दिग्गजांना फटका तर जिल्हा भाजपम्य 
नागपूर प्रतिनिधी: विधानसभा निवडणुकीमध्ये नागपूर जिल्ह्यात मतदारांनी महायुतीला च्या बाजूने कौल दिला. जिल्ह्यात महायुतीने नऊ जागा मिळवल्या आठ जागा भाजप तर एक जागा शिवसेना शिंदे गटाला मिळविण्यात आले. नागपूर जिल्ह्यातील हाय प्रोफाईल नेते माजी मंत्री सुनील केदार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वर्चस्वाला सुरूग लावत सावनेर मध्ये आशिष देशमुख तर काटोल मध्ये चरणसिंग ठाकूर हे दोन्ही उमेदवार विजयी झाले.रामटेक च्या गडावर राजेंद्र मुळक अपक्ष उमेदवार यांना शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आशिष जयस्वाल यांनी धोबी पचाड देत रामटेक चा गट आपल्या कडे कायम ठेवला.तर काटोल मधुन अपक्ष उमेदवार याज्ञवलक्य के जिचकार यांना 13973 मतांवर समाधान मानावे लागले.
नागपूर ग्रामीण चा विचार केला तर महाविकास आघाडीचे उमेदवार संजय मेश्राम यांना विजय खेचून आणण्यात यश आले.तर शहरात भाजप ला चार जागा तर आघाडी ला दोन जागेवर समाधान मानावे लागले. नागपूर मध्ये हाय प्रोफाईल जागा असलेल्या दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस मोठ्या मताधिक्याने विजय झाले.दक्षिण नागपूर व मध्य नागपूर मध्ये चुरशी ची लढत असताना भाजपचे मोहन मते तर प्रवीण झटके विजयी झाले. नागपूर पश्चिम मधून विकास ठाकरे तर पूर्व नागपूरमधील कृष्णा खोपडे भाजप तर उत्तर नागपूरहून नितीन राऊत काँग्रेसचे कामठी क्षेत्रातून चंद्रशेखर बावनकुळे,हिंगणा मधून समीर मेघे विजयी झाले. राज्यातील पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतून भाजप पक्षाची सुनामीने नागपूर जिल्हा भाजपम्य झाला.
