सहा जनावरांन च्या खाद्यात युरिया टाकून मारण्याचा परत्न
November 21, 2024
82 Less than a minute
काटोल तालुक्यातून मोठी बातमी
शेजाऱ्याने केला घात
सहा जनावरांन च्या खाद्यात युरिया टाकून मारण्याचा परत्न काटोल तालुक्यातील खडकी गावात करण्यात आला.विलास नारायण युवनाते से आरोपी चे नाव असून तो खडकी येथिल रहवाशी आहे. 20 नोव्हेंबर ला संध्याकाळी सात तें आठ वाजता च्या दरम्यान आरोपीने जनावरे गोठ्यात बांधले असतांना खादयात युरिया टाकला जेवण केल्या नंतर शेत मालक गोठ्यात आले असता जनावरे तडफडत असतांना दिसलें त्यांनी काही विलंब न करता उपचार केला, पाच जणवरांना वाचविण्यात त्यांना यश आले परंतु एका गाईचा मृत्यू झाला. या घटनेची तक्रार काटोल पोलीस स्टेशन ला शेतमालक बंडू विठोबा भोयर राहणार खडकी ता काटोल यांनी दिली. आरोपी हा फरार असल्याचे सांगण्यात येतअसून आरोपी चे शेत फिर्यादी च्या शेताच्या बाजूला आहे. आरोपीने हे कृत्य फिर्यादी सोबत शुल्क करणा उपस्थित करून चाकू वार केला होता, परंतु आरोपी चे समाधान न झाल्याने त्याने जनावरांना युरिया टाकून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी घटना स्थळी जाऊन चौकशी केली पुढील तपास सुरु आहे