
“उद्धव ठाकरे विदर्भाचे गद्दार, त्यांनी विदर्भातील शिवसैनिकांची माफी मागावी!”
नागपूर |शिवसेना पक्ष फुटला अन् शिंदे गट भाजपसोबत गेला. तेव्हापासून शिंदेगटातील नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना डावललं. काँग्रेस- राष्ट्रवादीसोबत गेले. त्यामुळे आम्ही शिवसेना पक्ष सोडला असा घणाघात शिंदे गटातील नेत्यांनी केला. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी माफी मागावी, अशी मागणी आता करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे हे विदर्भाचे गद्दार आहेत. त्यांनी माफी मागावी, अशी मागणी शिंदे गटाचे आमदार नरेंद्र बोंडेकर यांनी केली आहे.उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र
उद्धव ठाकरे यांनी भंडाऱ्यात सभा घेणार असल्याचं सांगितल्यानंतर शिंदे गटाचे आमदार नरेंद्र बोंडेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे विदर्भाचे गद्दार आहेत. त्यांनी आधी विदर्भातील शिवसैनीकांची माफी मागावी. 2019 च्या निवडणुकीत मी जिल्हाप्रमुख होतो. तिकीट तर सोडाच. पण उमेदवार उभे करायचे होते. तर तुमचा फोन स्विच ॲाफ होता. तुमच्याशी संपर्क करता आला नाही, असं नरेंद्र बोंडेकर म्हणाले आहेत.उद्धव ठाकरे भंडाऱ्यात येत आहेत. मात्र ते इकडे येऊन त्याचं काही फरक पडणार नाही. लोकांना त्यांचं काम आणि आमचं काम माहिती आहे. उद्धव ठाकरे यांनी विदर्भातील शिवसैनिकांवर अन्याय केला आहे. त्यामुळे त्यांनी माफी मागावी, असं नरेंद्र बोंडेकर म्हणाले आहेत.
Live Cricket
Live Share Market



