
दुर्मिळ पोपटांची विक्री करणाऱ्या एकाला अटक, ४ दुर्मिळ पोपटांची सुटका
या दुकानात रोजरिंग पॅराकिट या प्रजातीचा पोपट आढळला, जो अतिशय दुर्मिळ आहे. त्यांची खरेदी विक्री करणे हा गुन्हा आहे, हे माहीत असूनही दुकानदार आकाश गजधाने याने हे पोपट विकण्यासाठी आणले होते. वन विभागाचे अधिकारी शैलेश देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली आहे. दरम्यान नागरीकांनी वन्य जीव पाळू नयेत असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आलं आहे.वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ सुधारणा २०२२ च्या कायद्यानुसार पोपटांची विक्री करणे किंवा जवळ बाळगणे या करीतातीन वर्षा पर्यंतच्या कारावासाची शिक्षा किंवा १ लक्ष दंडाची अथवा दोन्ही शिक्षेची तरतुद आहे. तरी वन विभागाकडून आवाहन करण्यात येते की,कोणीही वन्यप्राण्यांची शिकार, विक्री, त्यांच्या नैसर्गिक अधिवासास इजा पोहचविणे किंवा जवळ बाळगणे हा गुन्हा आहे. तसे कोणी केल्याचे आढळले तर संबधितांविरूध्द तात्काळ कारवाई करण्यात येऊ शकते.


