चोरट्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी मुलीला शाळेतून आणण्यासाठी जात होती पण पोहोचलीच नाही

कल्याण |कल्याण जवळच्या आंबिवली परिसरात मंगळवारी सकाळी हा प्रकार घडला. प्रिया सावंत असे पीडित महिलेचे नाव आहे.या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला मंगळवारी सकाळच्या सुमारास तिच्या मुलीला शाळेतून आणण्यासाठी जात होती. त्यावेळी ती फोनवर बोलत होती. मात्र मोहन कॉलनी ऑफीसर क्वॉर्सजवळ आल्यानंतर एका अज्ञात इसम अचानक तिच्या मागून आला. त्याने त्या महिलेच्या गळ्यातील चेन आणि मंगळसूत्र खेचून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण त्या महिलेने त्याला रोखत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला.

पकडले जाण्याच्या भीतीमुळे त्या चोराने धारधार शस्त्राने तिच्यावर हल्ला केला. तिचा गळा, हात, पोट, मान आणि पाठीवर वार झाल्याने ही महिला गंभीर जखमी झाली. हे पाहून चोरट्याने तेथून पळ काढला. रस्त्यावरील पादचाऱ्यांनी मदतीसाठी धाव घेत त्या महिलेला उचलून दवाखान्यात नेले. तेथे तिच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर महिलेचा पतीही तिथे आला. पुढील उपचारांसाठी तिला कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे तिच्यावर उपचार सुरू असून सध्या प्रकृती स्थिर असल्याचे समजते. या प्रकरणी खडकपाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन् दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून हल्लेखोराचा शोध घेण्यात येत आहे.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close