राजस्थानहून मुंबई गाठली, पाणीपुरीही विकली; बुलेटच्या लोभाने सगळं केलं, पण…

मुंबई |  राजस्थानहून मुंबईत आलेले ते तिघे मित्र.. इतरांप्रमाणेच मुंबईत आले असं बाकीच्यांना वाटलं. पण त्यांच उद्दिष्ट काही वेगळंच होतं. त्यांना दिसत होत्या रॉयल एनफिल्ड बुलेट्स. त्या चोरण्याच्या हेतूनेच त्यांनी राजस्थानमधलं चित्तोरगढ सोडलं आणि मुंबई गाठली. दोन बाईक्स चोरून ते गावी घेऊन गेलेही, मात्र तिसरी बाईक लांबवण्यापूर्वीच त्यांचं नशीब फिरलं आणि हातात पडल्या पोलिसांच्या बेड्या  बाईक्स चोरणाऱ्या त्या तिघांना अंधेरी पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून चोरीच्या दोन बाईक्सही जप्त करण्यात आल्या आहेत. हे तिघेही आरोपी गेल्या महिनाभरापासून मुंबई आणि पुण्यात राहून पाणीपुरी विकून उदरनिर्वाह करत होते आणि स्वयंपाकी म्हणून काम करत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

रमेश मेनारिया (वय 31), हिम्मत गुजर (वय 32), आणि हिरालाल अहीर (वय 24) या तिघांचा एकच उद्देश होता, ते म्हणजे कसंही करून बुलेट्स मिळवणं. बराच काळ प्रयत्न करूनही अपयशच हाती लागलं. मात्र काही दिवसांनी त्यांनी मरीन ड्राइव्ह आणि अंधेरीमधून दोन बाईक्स चोरल्याच.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “ऑगस्टमध्ये ते मुंबईत आले आणि त्यांनी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेजवळ लॉक तोडून बुलेट चोरली. त्यापैकी दोघांनी गाडी त्यांच्या गावी परत नेली. मुंबईत रहात असताना त्यांनी प्रसंगी पाणीपुरीदेखील विकली. एका बाईकची चोरी यशस्वी झाल्यावर आणखी दोन बाईक मिळवण्याच्या इच्छेने ते (आरोपी) सप्टेंबरमध्ये मुंबईला परतले. मरीन ड्राईव्हवरून त्यांनी दुसरी बाईक चोरली आणि ती घेऊनही ते गावी गेले. ”अखेर पोलिसांना त्यांच्या खबऱ्यांकडून महत्वाची माहिती मिळाली. या तिघा आरोपींपैकी एक असलेला रमेश मेनारिया याच्या ठिकाणाची पोलिसांना माहिती मिळाली. तो ताडदेव परिसरात असल्याचे समजताच, पोलिसांनी सापळा रचून मेनारियाला अटक केली. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याच्या इतर दोन साथीदारांपर्यंत पोहोणे फारसे कठीण नव्हते. गुज्जर आणि अहीर या दोघांना पुण्यातून अटक करण्यात आली.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close