
शेकापूर शाळेत उत्साहात शिवजयंती उत्सव संपन्न

शेकापूर शाळेत उत्साहात शिवजयंती उत्सव संपन्न
प्रतिनिधी /19 फेब्रुवारी काटोल news : काटोल – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त ‘जिल्हा परिषद प्राथमिक शाळा , शेकापूर’ येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक गणेश कोचे, सहाय्यक शिक्षक राजेंद्र टेकाडे, स्वयंसेविका मनिषा धुर्वे, तसेच मदतनीस रोहिणी धुर्वे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन आणि अभिवादनाने झाली. यानंतर विद्यार्थ्यांनी महाराजांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी कथा सादर केल्या. शिवाजी महाराजांच्या धैर्य, शौर्य आणि न्यायप्रिय कारभारावर प्रकाश टाकत शिक्षक राजेंद्र टेकाडे यांनी ऐतिहासिक संदर्भ देत मार्गदर्शन केले. त्यांनी स्पष्ट केले की, छत्रपती शिवाजी महाराज केवळ एक पराक्रमी योद्धाच नव्हे, तर लोककल्याणकारी राजे होते. शिवरायांनी तत्कालीन परिस्थिती नुसार स्वराज्य स्थापनेचा ध्यास घेतला आणि जनतेसाठी न्याय, समानता व सुरक्षिततेचा आदर्श ठेवला.
महाराजांच्या काळातील प्रशासन, स्त्रीसन्मान, शिस्तबद्ध सैन्यदल आणि लोककल्याणकारी धोरणावर मुख्याध्यापक गणेश कोचे यांनी प्रकाश टाकला.
कार्यक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.शेकापूर शाळेत उत्साहात शिवजयंती उत्सव संपन्न
घेतले.
