
फुग्यात हवा भरताना सिलेंडरचा स्फोट, १ ठार तर ११ जखमी
लातूर | : रंगीबेरंगी, हवेत डुलणारे छान-छान फुगे घेऊन तो गल्ल्यांमध्ये फिरत होता. ते फुगे पाहून अनेक मुलं त्याच्या मागे-माग फुरत होती. एक गल्लीत तो थांबला आणि समोर आलेल्या मुलाला देण्यासाठी फुग्यात हवा भरतच होता तितक्यात…. धाडकन आवाजाने आसमंत दणाणून गेला. एका झटक्यात एवढा मोठा स्फोट झाला की सगळचे हादरले. फुग्यात हवा भरताना गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन झालेल्या अपघातात एकाच मृत्यू झाला असून ११ जण जखमी झाले.लातूर शहरातील तावरजा कॉलनी परिसरात रविवारी संध्याकाळी ही दुर्दैवी घटना घडली. या स्फोटामध्ये फुगेवाल्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हा स्फोट एवढा भीषण होता, की त्या स्कूटरचाही चक्काचून झाला. तर फुगे घेण्यासाठी त्याच्याजवळ गर्दी केलेल्या मुलांपैकी ११ मुलं गंभीर जखमी झाली. जखमी बालकांवर सध्या लातरच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत असल्याचे समजते.
मात्र यापुढे अशा दुर्घटना होऊ नयेत यासाठी अशा विक्रेत्यांवर बंदी घालावी. जो त्रास आम्हाला झाला तो इतर कोणालाही होऊ नये यासाठी आम्ही ही मागणी करत आहोत, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
Live Cricket
Live Share Market



