चार वर्षांच्या चिमुरडीच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

                                                                                                          मुंबई | 11 ऑक्टोबर 2023 : विरार पश्चिम येथे बचराज नावाची 19 मजली हाय प्रोफाईल इमारत आहे. तेथील चौथ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये सालीयान कुटुंबीय भाड्याने राहतात. त्यांना दर्शनी नावाची एकुलती एक मुलगी होती. मिस्टर सालियान हे मुंबईत कामासाठी जातात. काल सकाळी देखील ते कामाला जाण्यासाठी निघाले. मुलगी झोपल्याने तिच्या आईने तिला घरीच ठेवले आणि ती पतीला सोडण्यासाठी स्टेशनवर गेली.मात्र थोड्यावेळाने त्या चिमुरडीला जाग आली, ती आईला शोधू लागली पण आई घरात कुठेच दिसेना. अखेर ती बेडरुममध्ये खिडकीजवळ जाऊन वाकून पहात होती. अचानक तिचा तोल गेला आणि ती खाली पडली. उंचावरून पडल्याने त्या चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला.

अवघ्या चार वर्षांच्या चिमुरडीच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. बिल्डरने ही 19 मजली इमारत तर बांधली पण बेडरूम च्या खिडकीला सुरक्षत्मक ग्रील बसवलेली नव्हती. त्यांनी हे काम केले नव्हते तर फ्लॅटच्या मालकांनी तरी ग्रील बसवायला हवी होती, असे मत काही लोकांनी व्यक्त केले. तर एवढ्याशा मुलीला घरी एकटीला सोडून तिचे आई-वडील बाहेर गेले नसते तर आणि खिडकीला सुरक्षात्मक लोखंडी ग्रील असती तर एका चिमुरडीचा जीव आज वाचला असता, असंही काही लोकांचं म्हणणं आहे.

आई-वडिलांनी घेतला धाडसी निर्णय

सालियान कुटुंबाने समाजासाठी एक निर्णय घेतला आहे. तिच्या आई वडिलांनी एक मोठा धाडसी निर्णय घेऊन, तिचे डोळे दान केले आहेत.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close