
बेलोना हनुमान मंदिरात दान पेट्यांसाठी बैठक संपन्न .!
बेलोना हनुमान मंदिरात दान पेट्यांच्या निर्णया साठी झाली बैठक
.
नवीन दत्तात्रेय मंदिर बांधकामासाठी झाली चर्चा
रथांमध्ये यानंतर बसणार फक्त ऐकटे पुजारी
बेलोना प्रतिनिधी: चंद्रशेखर मस्के
मारोती मंदिरात सार्वजनिक दान पेटी असताना सुद्धा मारोती महाराज देवस्थान या नावाने नवीन दानपेट्या का लावण्यात आल्यात यासाठी मारोती मंदिरातील सभा मंडपात रथ यात्रा उत्सव समितिचे अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद शिक्षण समिती अध्यक्ष उकेश चव्हाण, प्रमोद राठोड, उपसरपंच किशोर चंदेल, बैजू बनाफर, दयालासिंग राठोड, अमरसिंग सेंगर, गुलाबराव
हेडाऊ, राहुल चव्हाण, संजू चव्हाण, भूषन नाखले, विजय जोशी, प्रदीप जोशी, विलास लाखे, उमेश चव्हाण, गुड्डू जखनावत, दिनू चव्हाण, हनुमान चालीसा मंडळातील तरुण मंडळी आणि गावकरी जनता याच्यामध्ये ही बैठक घेण्यात आली . बैठकी मध्ये दानपेटी का बसविण्यात आली. यामागचे कारण काय आतापर्यंत ऐकच असताना हनुमान जयंतीला सर्वांच्या समोर खुली करून त्यातील पैसे मोजल्या जायचे परंतु जर आता मारोती देवस्थान दान पेटी ठेवत असेल तर यापुढे मंदिराचे रंग रगोटी संजू चव्हाण स्वतः करणार नाही तसेच गावकरी मंदिराचे कुठलेच कार्य स्वतःच्या खर्चाने करणार नाही तसेच मंदिर परिसर स्वच्छ हा मारोती देवस्थान याना करावा लागेल जर मान्य असेल तर तुम्ही तुमच्या मारोती देवस्थान या नावाने तुमच्या दान पेट्या ठेऊ शकता. .गावकऱ्यांनी जी ऐक पेटी ठेवली आहेत तीपण मारोती देवस्थान या दान पेटी टाकून देत आहेत जर असे मंजूर असेल तर सांगा नाहीतर आम्ही गावकरी तुम्हाला वर्षाचे साठ हजार रुपये देऊ आणि मंदिर परिसर आम्ही स्वच्छ ठेऊ असे महत्वाचे निर्णय घेण्यात आले . बजरंग बलीची मूर्ती ही रथा मध्ये बसणाऱ्या लोकांमुळे दिसत नसल्यामुळे यापुढे महाराज व्यतिरिक्त कोणी बसणार नाही तसेच रथाच्या बाजूला रथावरती कोणी लटकून उभे राहणार नाहीत . तीन दिवस यात्रेमध्ये भाविक भक्त हनुमंताचे दर्शन घेण्यासाठी दूर दुरून येत असतात त्यामुळे त्यांना हनुमंताचे दर्शन घेता येईल आणि हा निर्णय सर्व गावकरी जनतेने उचलून धरलं असता महाराजांनी पुढच्या वेळेस फक्त महाराजच बसेल आणि गावकरी जनतेची मी नाराजी होऊ देणार नाही .मारोती मंदिराचे भव्य बांधकाम करण्यासाठी चर्चा करण्यात आली
तसेच मारोती मंदिराचे भव्य बाधकाम करण्यासाठी बैजू बानाफर यांनी 51 हजार रुपये प्रेमसिंग जखणावत 51 हजार रुपये सुंदरसिंग गैहरवाल 25 हजार रुपये तसेच बऱ्याच ग्रामस्थांनी आपल्या परीने देणगी निश्चित केली . नवीन दत्तात्रेय मंदिराचे बांधकाम आणि येणारा खरच यासाठी चर्चा करण्यात आली या मंदिराच्या बांधकामासाठी प्रदीप जोशी यांनी एक लाख रुपये देणगी कबूल केली असून भूमिपूजन 23/12/2021 गुरुवारला होणार आहेत .



