
अनिल देशमुख च्या घरी इन्कम टॅक्स विभागाची छापेमारी.
मुंबई : सीबीआय, ईडीनंतर आता आयकर विभागाच्या रडारवरही राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आले आहेत. अनिल देशमुख यांच्या मालमत्तेवर आज
इन्कम टॅक्स विभागाने छापेमारी केली आहे. नागपुरातील त्यांच्या मालमत्तेवर इन्कम टॅक्स विभागाने छापा टाकला आहे.अनिल देशमुखांच्या काटोल येथील घरी, ट्रॅव्होटेल हॉटेलसह नागपूर जिल्ह्यातील सहा ठिकाणी आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. मुंबईतल्या सुखदा आणि ज्ञानेश्वरी या निवासस्थानीही आयकर विभागाकडून चौकशी सुरु आहे. अनिल देशमुख आणि कुटुंबियांच्या नावे असलेल्या शेल कंपन्यांच्या माध्यमातून झालेल्या पैशांच्या व्यवहारांबाबत माहिती घेतली जातेय. मुंबई, पुणे आणि नागपुरातील घरी आणि मालमत्तांवर आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे.
इन्कम टॅक्स विभागाने छापेमारी केली आहे. नागपुरातील त्यांच्या मालमत्तेवर इन्कम टॅक्स विभागाने छापा टाकला आहे.अनिल देशमुखांच्या काटोल येथील घरी, ट्रॅव्होटेल हॉटेलसह नागपूर जिल्ह्यातील सहा ठिकाणी आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. मुंबईतल्या सुखदा आणि ज्ञानेश्वरी या निवासस्थानीही आयकर विभागाकडून चौकशी सुरु आहे. अनिल देशमुख आणि कुटुंबियांच्या नावे असलेल्या शेल कंपन्यांच्या माध्यमातून झालेल्या पैशांच्या व्यवहारांबाबत माहिती घेतली जातेय. मुंबई, पुणे आणि नागपुरातील घरी आणि मालमत्तांवर आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे.अनिल देशमुखा यांच्या विरोधात लूक आऊट सर्क्युलर जारी
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटकं आणि 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपांनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि आयपीएस अधिकारी परमबीर सिंह हे वेगवेगळ्या तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. पण हे दोघेही तपास यंत्रणांच्या हाती मात्र लागत नाहीत. चार ते पाच वेळा समन्स बजावल्यानंतरही अनिल देशमुख ईडीसमोर हजर न राहिल्यामुळं त्यांच्या नावानं लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं आहे. अशातच आता अनिल देशमुखांचा शोध घेण्यासाठी ईडीनं सीबीआयकडे मदत मागितली आहे.
Live Cricket
Live Share Market


