पगार मागितला म्हणून मारहाण, जखमी कामगाराचा मृत्यू,
November 4, 2023
55 Less than a minute
पुणे | पगारावरून झालेल्या वादानंतर झालेल्या मारहाणीमध्ये जखमी झालेल्या एका कामगाराचा मृत्यू झाला. अविनाश भिडे (वय ३६, रा. बेनकर वस्ती, धायरी) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. शिवाजीनगर येथील मॉडेल कॉलनी परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. याप्रकरणी भिडे यांच्या पत्नीने चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी १३ आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मृत इसम अविनाश भिडे हे शेखर महादेव जोगळेकर यांच्याकडे कामाला होते. शिवाजीनगर येथील मॉडेल कॉलनीमधील ऑफीसमध्ये भिडे हे मशिन ऑपरेटर म्हणून कार्यरत होते. मात्र पगारावरून भिडे आणि जोगळेकर या दोघांमध्ये वाद झाला होता. यापूर्वीही शेखर आणि प्रणव जोगळेकर यांनी अविनाश यांना शिवीगाळ करून मारहाण करून ऑफिस मधून हाकलून दिले होते. त्यानंतर पगाराच्या मुद्यावरून एक सप्टेंबर रोजी आरोपींनी भिडे यांना बेदम मारहाण केली. त्यामध्ये भिडे गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्याच उपचारांदरम्यान भिडे यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला.