
ज्येष्ठांचे अधिकार जनजागृती कार्यक्रम संपन्न
ज्येष्ठांचे अधिकार जनजागृती कार्यक्रम संपन्न
वार्ता नरखेड, आज दिनांक 28 ऑक्टोबर 2023 रोजी तालुका विधी सेवा समिती नरखेड तर्फे नरखेड पोलीस स्टेशनमध्ये जेष्ठ नागरिकांसाठी कायद्याविषयी मार्गदर्शनपर शिबीर घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका विधी सेवा समिती नरखेडच्या अध्यक्षा तथा दिवाणी आणि फौजदारी मुख्य न्यायाधीश श्रीमती वृषाली सुंगारे उपस्थित होत्या, त्यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी चा कायदा 2007 बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमा चे प्रमुख पाहुणे सहदिवाणी न्यायाधीश प्रवीण आर पाटील यांनी ज्येष्ठ नागरिक तसेच अस्तित्वात असलेल्या निरनिराळ्या बऱ्याच कायद्यांबाबत नागरिकांना जागरूक केले. तालुका वकील संघाचे अध्यक्ष एडवोकेट सी. बी. बागडे, एडवोकेट सुदेश मानकर उपस्थित होते त्यांनी उपस्थिताना कायद्याविषयी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाला नरखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री कृष्णकांत तिवारी, उप पोलीस निरीक्षक श्रीमती गुरुकर व नरखेड पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस कर्मचारी, एडवोकेट मुकेश तिवारी, परिसरातील जेष्ठ नागरिक, पोलीस पाटील संघ तालुका नरखेड, विधी सेवा पी एल व्ही व पत्रकार वर्ग मोठ्या संख्येने तसेच पोलीस पाटील संघ प्रमुख विजय घाडगे, बी. जी बनकर, संजय देशमुख, पत्रकार संजय वाळके, श्री ढोके इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन तसेच आभार प्रदर्शन विधिज्ञ सुदेश मानकर यांनी केले.
