
काळा-पिवळा गमछा, रुमाल असणाऱ्यांना नो एन्ट्री; ‘शासन आपल्या दारी’च्या पोस्टरला काळं फासलं
मराठा समाज आरक्षणासाठी अधिक आक्रमक झाला आहे.
यवतमाळ | : यवतमाळमध्ये आज सकाळी 11 वाजता शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होत आहे. साधारण 35 हजार लाभार्थ्यांना लाभाचं वाटप करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. पण छत्तीसगडच्या निवडणूक प्रचाराला जात असल्याने फडणवीस यांनी आपला दौरा रद्द केला आहे.काळा रुमाल, गमछा नो एन्ट्री
दरम्यान, कार्यक्रम स्थळी मराठा आंदोलक आंदोलन करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शासन आपल्या दारी कार्यक्रमात सुरक्षेसाठी विशेष जाळ्या लावण्यात आल्या आहेत. शिवाय येणाऱ्या लोकांसाठी वेगवेगळे कंपार्टमेंट करण्यात आले असून त्या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. स्टेजपर्यंत कुणी पोहोचणार नाही. याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीची कसून तपासणी केल्यानंतरच त्यांना सोडलं जात आहे. काळा रुमाल, काळा गमछा, पिवळा गमछा घालून आलेल्यांना प्रवेश नाकारला जात आहे.
Live Cricket
Live Share Market


