
दोन्ही आरोपींना अंमली पदार्थांचे व्यसन होते.व्यसनासाठी हवा होता पैसा
एक 62 वर्षीय महिला तिच्या एका मैत्रिणीसोबत एका प्रदर्शनाला गेली होती. प्रदर्शन पाहून बाहेर पडल्यानंतर आदित्य कॉलेजजवळ पार्क केलेल्या कारच्या दिशेने ती महिला परत जात असताना दोघांनी तिच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावली आणि तेथून पळ काढला, असे पोलिसांनी सांगितले. याप्ररकरणाची तक्रार मिळाल्यानंतर चोरांचा शोध घेण्याच्या दृष्टीने पोलिसांनी त्या परिसरातील सर्व सीसीटीव्हींचे फूटेज तपासले, मात्र त्यावरून त्यांना चोरांचा कोणताही सुगावा लागला नाही.अखेर, एका खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी परमार या संशयिताचा शोध घेतला, ज्याला MHB पोलिसांनी यापूर्वीही चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात अटक केली होती. परमारला बारोटपाडा, बोरिवली शिंपोली येथून अटक करण्यात आली. पोलिसांकडून त्याची कसून चौकशी करण्यात आली असता, त्याने गुन्ह्याची कबूली दिली, तसेच यामध्ये आपला आणखी एक साथीदाराचाही, आकाश विवेक सिंग याचाही सहभाग असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. विशेष म्हणजे आकाश सिंग हा नुकताच 2 ऑक्टोबर रोजी 18 वर्षांचा झाला होता. आकाश आणि परमार या दोघांनी 6 ऑक्टोबर रोजी एकत्र पहिला गुन्हा केला होता.या आरोपी दुकलीने फसवणूक आणि चोरीचा दुसरा गुन्हा केल्याचे पोलिस तपासात उघड झाले. रस्ता विचारण्याचा बहाण करून त्यांनी 17 ऑक्टोबर रोजी बोरीवलीतील बबई नाका येथे एका 36 वर्षीय महिलेची चेन चोरली होती


