पुणे शहरात एका अधिकाऱ्यांना मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घातला.

पुणे | पुणे येथील ड्रामा नाईन हॉटेलमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. या हॉटेलमध्ये फुकटच्या मद्यासाठी एका अधिकाऱ्याने धिंगाणा घातला. हा अधिकारी चक्क एक्साईज डिपार्टमेंटमधील होता. विकास अबने असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. त्याने ड्रामा नाईन हॉटेलमध्ये जाऊन दारूची मागणी केली. हॉटेल बंद असताना त्याने दारूची मागणी केली. त्यावेळी हॉटेलच्या मॅनेजर सांगितले की, हॉटेल बंद झाले आहे. यामुळे आता दारु देता येणार नाही. परंतु तो अधिकारी काहीच ऐकण्याच्या मनस्थित नव्हता.

विकास अबने या एक्साईज डिपार्टमेंटमधील अधिकाऱ्याने हॉटेलबाहेर एका जोडप्याला मारहाण केल्याची बाब उघड झाली आहे. परंतु या प्रकाराची पोलीस ठाण्यात अजून नोंद झालेली नाही. व्हायरल झालेल्या या प्रकारानंतर एक्साईज डिपार्टमेंटचे अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार? हा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जात आहे.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close