मित्राचे पैसे काढण्यासाठी बिश्नोई गँगच्या नावे धमकी, दोघांना अटक

 डोंबिवली |   मित्राचे पैसे काढण्यासाठी दोन आरोपींनी एका बांधकाम व्यावसायिकाला बिश्नोई गँगच्या नावाने जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर रामनगर पोलीसांनी तत्परतेने कारवाई करत दोन आरोपींच्या मुसक्या आवळत त्यांना बेड्या ठोकल्या. आकाश रमेश गिरी आणि इंद्रजीत यादव अशी त्यांची नावे असून या आरोपींनी आणखी कोणाकोणाला अशी धमकी दिली आहे आणि त्यांचा या गँगशी काय संबंध आहे, याचा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.या कॉलमुळे धास्तावलेल्या जाधव यांनी तातडीने रामनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तेथील अधिकाऱ्यांना सर्व प्रकार सांगितला. बिश्नोई गँगचं नाव समोर आल्याने रामनगर पोलिसांनी तत्काळ तपास केला. अथक तपासानंतर त्यांनी आकाश रमेश गिरी आणि इंद्रजित राजाराम यादव या नावाच्या दोन्ही आरोपींना ताब्यात घेत त्यांना बेड्या ठोकल्या. त्यांची चौकशी करण्यात आली असता खरं काय ते समोर आलं.इंद्रजित हा प्रशांत जाधव यांच्याकडे कामाला होता. त्याचे काही पैसे जाधव यांनी देणे बाकी होते. इंद्रजितने वारंवार मागूनही जाधव यांनी पैसे काही दिले नाहीत त्यामुळे तो खूप वैतागला होता. अखेर त्याने याबद्दल त्याचा मित्र आकाशला सांगितले आणि त्यांनी दोघांनी हा प्लान आखला. आकाश याने विठ्ठल यांना धमकावण्यासाठी कॉल करत स्वतःला बिश्नोई गँगचा शूटर असल्याचे सांगितल. सध्या या प्रकरणी रामनगर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे
Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close