
घटनेमुळे गावकरी हादरले बाप-लेकांचा बुडून दुर्दैवी मृत्यू,
घरची कपडे धुण्यासाठी गेलेल्या बाप-लेकांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
सांगली : सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील करोली टी या गावात धुणे धुण्यास गेल्यानंतर पाय घसरून बंडगरवाडी तलावात पडल्यामुळे राजेंद्र अण्णाप्पा चव्हाण वय (48) आणि कार्तिक राजेंद्र चव्हाण वय (18) या बाप-लेकांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली आहे. कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिरा या घटनेची नोंद झाली आहे. काल झालेल्या या दुर्देवी घटनेमुळे गावकरी पुर्णपणे हादरुन गेले आहेत.तलावात त्या दोघांचेही मृतदेह सापडले
सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील करोली टी येथील राजेंद्र अण्णाप्पा चव्हाण आणि कार्तिक राजेंद्र चव्हाण हे घरातील धुणे धुण्यासाठी बंडगरवाडी तलाव परिसरात गेले होते. यावेळी ते पाय घसरुन पडले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. काल सायंकाळी सहाच्या सुमारास तलावाच्या लगत स्थानिकांनी त्यांचे धुणे दिसले, त्यामुळे काही लोकांना संशय आला त्यानंतर त्यांनी पाहणी केली असता. तलावात त्या दोघांचेही मृतदेह सापडले.
Live Cricket
Live Share Market



