
हत्येनंतर साहील खानने काय केलं?
नवी दिल्ली : संपूर्ण देशाला हादरवून सोडणारं भयानक हत्याकांड दिल्लीच्या शाहबाद डेरी एरीयामध्ये घडलं. आरोपीने भर रस्त्यात अल्पवयीन मुलीची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या केली. तिच्यावर सपासप 20 वार केले. हे सर्व लोकांच्या नजरेसमोर घडलं, पण कोणी या मुलीच्या मदतीसाठी पुढे आलं नाही. या प्रकरणातील आरोपीच नाव साहील खान आहे. मुलीची हत्या केल्यानंतर साहीलने काय केलं? त्याची माहिती समोर आलीय.
साहीलने मुलीची हत्या केल्यानंतर शाहबाद डेरी एरीया भागातील घटनास्थळावर तो अर्धातास फिरत होता. आरोपीने हत्येच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
हत्येनंतर साहील खानने काय केलं?
हत्या केल्यानंतर आरोपी साहील काहीवेळ जवळच्या पार्कमध्ये बसला होता. हत्या करण्यासाठी वापरलेला चाकू त्याच्याकडे होता. पार्कमधून निघाल्यानंतर साहील रिथाला भागात गेला. तिथे त्याने तो चाकू जंगलात फेकून दिला व स्वत:चा मोबाइल फोन स्वीच ऑफ केला.
सतत आपल्या बस बदलल्या
त्यानंतर साहिल ई-रिक्क्षाने समयपूर बादली भागात गेला. तिथे त्याने मेट्रो स्टेशनजवळ रात्र काढली. दुसऱ्यादिवशी सकाळी तो समयपूर बादलीहून आनंद विहार येथे गेला. तिथून तो बसने बुलंदशहरला गेला. अटकेची भिती असल्याने साहील सतत आपल्या बस बदलत होता, असं पोलिसांनी सांगितलं. इंडिया टुडेने ही माहिती दिलीय.
20 वेळा भोसकलं
या भयानक हत्याकांड प्रकरणातील आरोपी साहील खानला सोमवारी उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर येथून अटक करण्यात आली. त्याच्या मनात कुठलीही पश्चातापाची भावना नाहीय. त्याने अल्पवयीन मुलीला जवळपास 20 वेळा भोसकलं.
वणी येथे भाड्याने राहत होती तरुणी
मृत प्रिया ही मूळची वरोरा येथील रहिवासी आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ती वणीतील जैन ले-आउटमधील कृष्णा अपार्टमेन्टमधील पहिल्या माळ्यावरील एका फ्लॅटमध्ये किरायाने राहत होती. सोमवारी सकाळी या फ्लॅटमधून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असल्याची माहिती फ्लॅटचे मालक राकेश डुबे यांनी पोलिसांना दिली. माहिती मिळताच, पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला.
फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर घटना उघडकीस
फ्लॅटच्या दरवाजा बाहेरून बंद होता. दार उघडून आत बघितले असता, प्रियाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत जमिनीवर पडून होता. तिच्या डोक्यावर गंभीर स्वरूपाच्या जखमा होत्या. ही हत्या असल्याची शंका पोलिसांना आल्यानंतर पोलिसांनी त्या दिशेने आपला तपास सुरू केला. तपासात विनोद नामक तरुणाशी प्रियाचे प्रेमसंबंध होते आणि त्यानेच तिचा खून करून तो गावाकडे पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. वणीचे ठाणेदार प्रदीप सिरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली एक टीम आरोपीच्या शोधार्थ निघाली. त्यांनी आपल्या बुद्धिकौशल्याचा वापर करीत आरोपी प्रियकर विनोद शितोळे याला हिंगोली जिल्ह्यातील शिरोळी गावातून अटक केली. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे



