काटोलमध्ये आम आदमी पार्टीचा येल्गार — भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणा

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध प्रश्नांवर सरकारला तहसीलदारमार्फत निवेदन; कर्जमाफी न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा

 

काटोल (प्रतिनिधी) —काटोलमध्ये आज आम आदमी पार्टीच्या वतीने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी जोरदार आंदोलन करण्यात आले. तहसील कार्यालयासमोर सरकारविरोधात घोषणाबाजी करत, शेतकऱ्यांच्या अडचणींचा पाढा वाचण्यात आला. या आंदोलनानंतर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदारा मार्फत राज्य सरकारला निवेदन सादर केले.या निवेदनात, सततच्या नापिकी, वाढत्या कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्येकडे वळत असल्याची गंभीर बाब अधोरेखित करण्यात आली आहे. सरकारने त्वरित कर्जमाफी जाहीर न केल्यास, शेतकरी आणखी संकटात सापडतील, असा इशारा यावेळी देण्यात आला.जर येत्या काही दिवसांत शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर झाली नाही, तर आम आदमी पार्टीच्या वतीने आमरण उपोषण छेडले जाईल,” असा तीव्र इशारा पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाने दिला.अदोलनात अनेक शेतकरी, महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलकांच्या मागण्या पुढीलप्रमाणे:तात्काळ व संपूर्ण कर्जमाफीपी

पीकविमा योजना प्रभावी रित्या राबवावीला

शेतमालाला हमीभाव मिळावा

सिंचन सुविधा सुधारावी


संपूर्ण आंदोलन शांततेत पार पडले. यावेळी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला
Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close