
CRC नागपुर यांचे संयुक्त विद्यमाने मोफत सहाय्यक साधने वाटप
.
17/04/2023 रोज सोमवारला नगर भवन, काटोल येथे दिव्यांग व्यक्ति व जेष्ठ नागरिकांना समाज कल्याण विभाग जि.प.नागपुर, आरोग्य विभाग तसेच ALIMCO कानपूर व , CRC नागपुर यांचे संयुक्त विद्यमाने मोफत सहाय्यक साधने वाटप मा.आ.अनिलबाबु देशमुख, माजी गृहमंत्री ,म.रा.यांचे शुभहस्ते करण्यात आले, याप्रसंगी पं.स.सभापति संजय डांगोरे,जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले,उपसभापती निशिकांत नागमोते,जिल्हा परिषद सदस्य पुष्पाताई चाफले, माजी सभापती धम्मपाल खोब्रागडे, माजी उपसभापती अनुप खराडे,पं.स.सदस्य चंदा देव्हारे,प्रतीभा ठाकरे,लता धारपुरे, समाज कल्याण अधिकारी किशोर भोयर , सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.श्रीमती मेश्राम, गटविकास अधिकारी संजय पाटील,वि.अ.गावंडे,झेलगोंदे, तसेच शिवाजी देव्हारे,अजय लाडसे,संदीप ठाकरे,गणेश सावरकर, रुपेश नाखले,अयुब पठाण,अमित काकडे,समाज कल्याण, आरोग्य विभाग ,पंचायत समिती येथील अधिकारी व कर्मचारी तसेच दिव्यांग बांधव व भगीनी, जेष्ठ नागरिक व कार्यकर्ता मंडळी उपस्थित होते.याप्रसंगी 458 लाभार्थ्यांना विविध उपकरणाचे वाटप करण्यात आले.*
