
केंद्रीय नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी
केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली
आहे. नितीन गडकरी यांच्या खामला येथील कार्यालयातील फोनवर धमकी देणारा फोन आला होता. त्यानंतर नितीन गडकरी यांच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नितीन गडकरी यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्या नावे धमकी देण्यात आली असून, खंडणी मागण्यात आली असल्याची माहिती समोर आली.
केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. नितीन गडकरी यांच्या खामला येथील कार्यालयातील फोनवर धमकी देणारा फोन आला होता. त्यानंतर नितीन गडकरी यांच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नितीन गडकरी यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्या नावे धमकी देण्यात आली असून, खंडणी मागण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
राणेंच्या अडचणीत वाढ!
राणेंच्या अडचणीत वाढ! वर्ध्यात राष्ट्रवादीकडून तक्रार दाखलआमदार नितेश राणे यांनी वर्ध्यात खासदार अमोल कोल्हे यांचा एकेरी उल्लेख करत वादग्रस्त वक्तव्य केले होते. याप्रकरणी आमदार राणेंविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्धा जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पोटफोडे यांनी आर्वी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.महाबळेश्वरनजीक मुकदेव घाटातून 40 मजुरांना घेऊन जाणारा टेम्पो दरीत कोसळला, चौघांची प्रकृती चिंताजनक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे-तांब गावातील रस्त्याच्या कामावर मजुरांना घेऊन जाणारा टेम्पो महाबळेश्वर-तापोळा मार्गावरील मुकदेव घाटातील दरीत कोसळल्याने महिला, लहान मुलांसह अनेक मजुर जखमी झाले आहेत. जखमींमधील चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना सातारा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



