बँकांना बुडवणारी टोळी जेरबंद

एटीएम’मध्ये बिघाड करून बॅंकांना गंडवणारी टोळी जेरबंद, ‘एलसीबी’ची कारवाई या टोळीतील गुन्हेगारांनी १९ ‘एटीएम कार्ड्स’व्दारे ७६ वेळा वेगवेगळ्या ठिकाणच्या ‘एटीएम’व्दारे ७.५५ लाख रुपयांची रक्कम काढल्याचे प्रथमदर्शनी तपासात उघड झाल्याचे सांगण्यात आले आहे.

एटीएम मशीन’च्या वितरण व्यवस्थेत बिघाड करून बॅंकांना गंडविणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आले आहे. या टोळीतील गुन्हेगारांनी १९ ‘एटीएम कार्ड्स’व्दारे ७६ वेळा वेगवेगळ्या ठिकाणच्या ‘एटीएम’व्दारे ७.५५ लाख रुपयांची रक्कम काढल्याचे प्रथमदर्शनी तपासात उघड झाल्याचे सांगण्यात आले आहे.वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये कलम ४२० भादंवि, सहकलम ४३ (ई)(एच), ६६ (सी) माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये दाखल तक्रारीनुसार, दि वाशिम अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, वाशिम यांच्या अकोला, अमरावती, वाशिम, मानोरा आणि रिसोड येथे असणाऱ्या एटीएम मशीनद्वारे व्यवहार करत असताना एटीएममधून रोख रक्कम वितरणाप्रसंगी दोन बोटे ‘डिस्पेन्सिंग शटर’मध्ये ठेवून तथा बोटांच्या सहाय्याने कॅश वितरण यंत्रणेच्या रोलसीलला आत ढकलून मशीनमध्ये बिघाड केला जात होता. यामाध्यमातून संबंधित आरोपींनी ७.५५ लाखांची रक्कम परस्पर काढून घेतली होती. दरम्यान, कुठलेही ठोस धागेदोरे उपलब्ध नसताना केवळ तांत्रिक बाबींच्या आधारे प्रकरणाचा तपास करण्यात आला. त्यात १० वेगवेगळ्या बँकांच्या खात्यांशी संलग्न १९ एटीएम कार्डद्वारे ७६ वेळा वेगवेगळ्या एटीएममधून रक्कम काढण्यात आल्याचे निष्पन्न झाले.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close