ताज्या घडामोडी च्या बातम्या.

पोलीसांचा ड्रोन मदतीने  पतंग उडवणाऱ्यांवर वाच

नागपूर मकरसंक्रांत जवळ आली आहे. त्यामुळे पोलिसांनी आतापासून नागपूरात सगळीकडे लक्ष ठेवायला सुरुवात केली आहे .नागपुरात बंदी असतानाही पतंग  खेळण्यासाठी नायलॅान मांजाची सर्रास विक्री सुरु आहे. नायलॅान मांज्यामुळे प्रत्येकवर्षी असंख्य लोक जखमी होत आहेत. विशेष म्हणजे त्यामध्ये आतापर्यंत शेकडो पक्षांचा जीव जात आहे. नागपूर पोलिस नायलॅान मांज्याला आळा घालण्यासाठी ड्रोनच्या माध्यमातून वॅाच ठेवणार आहे. त्याचबरोबर पतंगाला नायलॅान मांजा दिसल्यास  . पोलीस संबंधीत व्यक्तीवर गुन्हा दाखल करणार आहे. मकरसंक्रातीच्या पार्श्वभुमीवर नागपूर पोलीसांचे पाच ड्रोन नायलॅान मांजाचा वापर करुन उडणाऱ्या पतंगीवर नजर ठेवणार आहे, अशी माहिती नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलीय

दिल्लीच्या कंझावाला प्रकणात   आरोपींनी क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्यात. समोर आले आहे

प्रकरणात आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. दिल्ली पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडीच्या खाली अंजलीचा मृतदेह अडकल्याचं माहिती होतं. पण भीतीमुळे काढला नसल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. गाडी चालवताना आरोपींना मृतदेह गाडीच्या खाली आल्याचं समजलं होतं. पण बॉडी काढताना कुणी पाहिलं तर आपल्यालाच गुन्हेगार समजतील, या भीतीमुळे आरोपींनी गाडी थांबवली नाही. बॉडी आपोआप गाडीखालून निघून जाईल, असं आरोपींना वाटलं होतं. पण बारा किमीपर्यंत अंजलीची बॉडी फरफटत राहिली.

राज ठाकरे  यांची  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका

पपरी-चिंचवड : “पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी देशाकडे लक्ष दिलं पाहिजे. देशातील प्रत्येक राज्य त्यांच्यासाठी समान असलं पाहिजे. आपण स्वत: गुजराती आहोत. त्यामुळे गुजरातला प्राधान्य देणं हे एका पंतप्रधानाला शोभत नाही”, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे  यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू सह  संजय गायकवाड यांच्यात नाराजी सूर

  प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर आपली नाराजी व्यक्त केली  त्यानंतर आता बुलडाणा जिल्ह्यातील शिंदे  गटाचे आमदार संजय गायकवाड यांनीही   मंत्रिमंडळ विस्ताराला आधीच खूप उशिर झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार करावा, अशी मागणी शिंदे  आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे. संजय गायकवाड यांच्या या मागणीनंतर शिंदे गटात मंत्रिमंडळ विस्तारावरून धुसफूस सुरू असल्याची चर्चा आहे.

संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले

आता शिंदे गटातील आमदारांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागल्याचं पहाय मिळत आहे. काल शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी 22 जानेवारीपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं म्हटलं होतं. तर आता आमदार संजय गायकवाड यांनी देखील मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरात लवकर करावा अशी मागणी केली आहे. मंत्रिमंडळ विस्तार गेल्या 4 महिन्यापासून लांबला आहे, त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार करावा अशी मागणी संजय गायकवाड यांनी केली आहे.

मंदिरात लग्न करुन वर्षभर संसार केला, मग अचानक घरातून गेला तो परतलाच नाही

तरुणीने त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा फोन बंद येत आहे. तरुणीने त्याच्या घरच्यांशीही संपर्क साधला, पण त्यांच्याकडूनही काही माहिती मिळाली नाही. यानंतर तरुणीने उत्तर प्रदेशातील जौनपूर गाठत पोलीस अधीक्षकांची भेट घेतली.

जौनपूर : सोशल मीडियाचा वाढता वापर आणि त्यातून प्रेमसंबंध जुळण्याच्या घटना हल्ली मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. यातून फसवणुकीच्या घटनांचे प्रमाणही वाढत आहे. अशीच एक घटना उघडकीस आली आहे. महाराष्ट्रातील नागपूरमधील तरुणीचे उत्तर प्रदेशातील एका तरुणासोबत इन्स्टाग्रामवर प्रेमसंबंध जुळले. यानंतर तरुण नागपूर आला आणि त्या दोघांनी लग्न केले. लग्नानंतर वर्षभराने पती अचानक गायब झालालग्नानंतर वर्षभर दोघे एकत्र राहत होते. दोघांचा सुखी संसार होता. त्यानंतर एक दिवस तरुणाच्या आईची तब्येत बिघडली म्हणून तो उत्तर प्रदेशात आईला भेटायला गेला आणि काही दिवसांनी परत आला. त्यानंतर पुन्हा एक दिवस तो अचानक गायब झाला.पतीचा शोध घेण्यासाठी पत्नीची पोलिसात धाव तरुणीने त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा फोन बंद येत आहे. तरुणीने त्याच्या घरच्यांशीही संपर्क साधला, पण त्यांच्याकडूनही काही माहिती मिळाली नाही. यानंतर तरुणीने उत्तर प्रदेशातील जौनपूर गाठत पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. पतीचा लवकरात शोध घेण्याची मागणी तरुणीने पोलिसांकडे लग्नानंतर दोघेही वर्षभर एकत्र राहत होते. त्यानंतर एक दिवस अचानक तिचा पती गायबच झाला. यानंतर तरुणीने उत्तर प्रदेशातील जौनपूर गाठत लवकरात लवकर पतीचा शोध घेण्याची विनंती पोलिसांना केली आहे.
Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close