बनावट प्रमानपत्र देणाऱ्या डॉक्टर टोळीतील 29 जणांवर गुन्हे दाखल

  म्होरके मात्र अद्यापही फरारच

नाशिक आंतरजिल्हा बदलीकरिता लागणारे वैद्यकीय प्रमाणपत्र हे बनावट  स्वरूपात डॉ. सैंदाणे बनवून देत होते.  या प्रकरणात   डॉ. स्वप्नील सैंदाणे याला नाशिक पोलीसांनी  अखेर बेड्या ठोकल्या आहेत. आज नाशिकच्या जिल्हा न्यायालयात त्याला हजर करण्यात आले होते त्यात न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस  कोठडी सुनावली आहे. डॉ. स्वप्नील सैंदाणे याला नाशिकच्या ग्रामीण पोलीसांच्या पथकाने नंदुरबार मधील अक्कलकुवा येथून अटक केली होती. याशिवाय त्याच्या एका साथीदाराला देखील अटक केली आहे. आंतरजिल्हा बदलीकरिता लागणारे वैद्यकीय प्रमाणपत्र हे बनावट स्वरूपात बनवून देत होते. डॉ. सैंदाणे याने सर्जन पदवी नसतांना एमडी सर्जन असल्याचे सांगत पोलिस कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय अहवालावर शिक्के आणि सही दिली होती.आत्तापर्यंत जवळपास 29 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून यामध्ये वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.हे सर्व गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते. त्यात डॉ. स्वप्नील सैंदाणे हे पोलीसांच्या हाती लागले असून त्यांचा एक साथीदार देखील पोलीसांच्या हाती लागला आहे.याशिवाय या प्रकरणातील नाशिक जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेले तत्कालीन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीनिवास आणि डॉ. निखिल सैंदाणे यांच्या नावाचा समावेश झाला आहे.त्यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज देखील दाखल केला होता, मात्र जिल्हा न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला असून त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी या बनावट प्रमाणपत्र रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

 

 

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...
Back to top button
Close
Close