जंगलात गळा दाबून केली पत्नीची हत्या

बियरच्या बाटलीने उघड केले हत्याकांड

आरोपी शिवराजने रतनगड माताच्या जंगलामध्ये पत्नी आस्था हिची 29 मे 2020 रोजी गळा दाबून निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर पत्नीची ओळख पटू नये म्हणून मृतदेहावर रॉकेल ओतून पेटवून दिले होते.दोन वर्षांपूर्वी दुहेरी हत्याकांड करूनही मारेकरी मोकाट होता. बियरबारमध्ये मित्रांसोबत दारू प्यायला बसला असताना ‘दोन मर्डर करूनही कसा वाचलो बघा’, अशा बढाया मारण्यास त्याने सुरुवात केली होती.एक बिअरची बाटली संपवल्यानंतर त्याने दुहेरी हत्याकांडाची कबुली दिली होती. मित्रांसमोरच बोललोय, त्यामुळे कसलाही धोका नाही, असा समज त्याने केला होता. पण शेजारच्या टेबलावर बसलेल्या व्यक्तीने त्याचा गुन्हा उघडकीस आणला.आरोपी शिवराज उर्फ राजा चव्हाण असे हत्या करणाऱ्या मारेकऱ्याचे नाव आहे. तो ग्वाल्हेरच्या सागर ताल आणि काशीपुरा या ठिकाणी दीर्घकाळापासून राहत होता. दोन वर्षापूर्वी त्याने आपली पहिली पत्नी आणि मुलाला संपवले होते. मात्र याबाबत कुणालाही खबर लागू दिली नव्हती.जंगलात गळा दाबून केली होती पत्नीची हत्याआरोपी शिवराजने रतनगड माताच्या जंगलामध्ये पत्नी आस्था हिची 29 मे 2020 रोजी गळा दाबून निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर पत्नीची ओळख पटू नये म्हणून मृतदेहावर रॉकेल ओतून पेटवून दिले होते.त्यानंतर यंदा मार्च महिन्यात आठ वर्षांच्या मुलाचीही गळा दाबून हत्या केली होती. आरोपी शिवराजने दोन लग्न केली आहेत. आस्था ही त्याची पहिली पत्नी होती तर मनीषा नावाच्या महिलेसोबत त्याने दुसरे लग्न केले होते.आस्था 2020 पासून बेपत्ता होती. मात्र त्याने या घटनेची कुठेही वाच्यता केली नव्हती. तसेच पत्नी बेपत्ता असल्याची तक्रारही पोलिसांत नोंद केली नव्हती. अखेर दोन वर्षांनंतर मित्रांसोबत दारू प्यायला बसला असताना शिवराजने हत्येच्या कटाचे सत्य उलगडले.ग्वाल्हेर पोलिसांकडून आरोपीला अटकग्वाल्हेरच्या क्राइम ब्रांचमधील पोलिसांनी दतिया पोलिसांशी संपर्क साधला आणि हत्या झालेल्या महिला आणि तिच्या मुलाची माहिती मिळवली. त्यानंतर ठोस पुरावे जमवून आरोपी शिवराजला रितसर अटक करण्यात आली .

 

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close