ठळक बातम्या, 1) सोनखाम व कोंढाली अपघात 2)अर्थसंकल्प शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारा, 3)ईडीच्या कारवाईमुळे सरकार पडणार नाही : रामदास आठवले

ई डी च्या  कारवाईमुळे सरकार पडणार नाही रामदास आठवले
शिवसेनेसोबत सरकार

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडनार  नाही. एक-दोन मंत्र्यांवर ईडीची कारवाई झाली म्हणजे सरकार पडेल, असे मला वाटत नाही.महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे  सरकार सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवत नाही.शेतकऱ्यांच्या  प्रश्नाचे दखल घेत नाही.तसेच राज्यात राष्ट्रपती राजवट आणण्याचा प्रश्नच नाही, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी आज पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

आम्ही कोणालाही पाठीशी घालत नाही, आमचे भाजप किंवा आरपीआय पक्षातील कोणी असे काही प्रकार केले असतील, तर त्यांच्यावर कारवाई करावी, परंतु आमच्यामध्ये भानगडी करणारे कोणी नाही, असेही आठवले यांनी यावेळी सांगितले. तसेच २०२४ मध्ये केंद्रात व राज्यांमध्ये पुन्हा भाजप-आरपीआयचे सरकार येणार.

नगर येथे एका कार्यक्रमानिमित्त आले असता मंत्री आठवले  बोलत होते. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत भालेराव, विजय वाकचौरे, अजय साळवे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे आदी उपस्थित होते. मंत्री आठवले म्हणाले की, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवत नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले नाही. त्यांच्या मंत्र्यांवर ईडीने कारवाई केलेली आहे. पण १-२ मंत्र्यांवर कारवाई झाली म्हणजे सरकार पडेल असे नाही. परंतु शिवसेना व राष्ट्रवादी आमच्या बरोबर आले. किंवा काँग्रेसने या सरकारचा पाठिंबा काढला, तर हे सरकार पडेल, असे ते म्हणाले.भविष्यामध्ये केजरीवालविरुद्ध मोदी असा काही संघर्ष होणार नाही. कारण मोदींच्या विरोधामध्ये केजरीवाल नव्हे, तर ममता बॅनर्जी, शरद पवार व अन्य काही नेते आहेत. त्यामुळे मोदींची लढाई सर्वाबरोबरच आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजूनही विचार करून अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला मान्य करावा. व भाजपासमवेत त्यांनी पुन्हा यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावरी कोंढाळी शिवारातील साबा हॉटेल समोर  हि घटना घडली असून संजय गोमाजी सरोदे वय  ५२राहणार खापरी बरोकर तालुका काटोल अशे मृतकाचे नाव आहे .मृतक हा आपल्या दुचाकिनी गावाला जात असतांना भरधाव आलेल्या MH40/ AR9157 क्रमांकाच्या कार ने दुचाकीला धडक दिली. त्यात संजयचा  जागीच मृत्यू झाला .

ट्रक्टर च्या ट्रॉलीतून  पडून कामगाराचा मृत्यू

 काटोल नागपूर महामार्गावरील ट्रक्टर च्या ट्रालीतून पडून कामगाराचा मृत्यू झाला .हि घटना सोमखांब शिवारात नुकतीच घडली असून कॅप्तान सिह वय ४५ राहणार सुपावस तालुका कुबेर जिल्हा भरतपूर अशे मृतकाचे नाव आहे .तो RJ 01/R9673 क्रमांकाच्या ट्रालीत बसून काटोल ला येणार होता .याच दरम्यान ट्रक्टर ची ट्राली  उसडल्याने  कॅप्तान सिह रोड वर पडून त्याला गंभीर दुखापत झाली   उपचारादरम्यान त्याचा मृत्य झाला .या प्रकरणी ट्रक्टर चालक चंद्रकांत विजय सिह यांच्या विरोधात काटोल पोलिसानी  गुन्हा दाखल            केला.

राज्यमंत्री  बच्चू कडू यांच्या मातोश्री इंदिराबाई बापूराव कडू यांचे दीर्घ आजाराने  आज निधन झाले .त्यांचे वय ८४  वर्ष असून अमरावती येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असतांना त्यांच्या राहत्या घरी बेलोरा येथे  आईचे निधन झाले .हि बातमी स्वतः बचू कडू यांनी ट्विट  वरून  दिलेली आहे .त्यांच्या पार्थीवावर उद्या रविवार ला सकाळी १० वाजता बेलोरा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे .

कृषी क्षेत्राला संजीवनी देणारा अर्थसंकल्प – सलील देशमुख उपमुख्यमंत्री  अजित पवार यांनी सादर केलेला  अर्थसंकल्प कृषी क्षेत्रासाठी  महत्वाचा आहे .हा अर्थसंकल्प  शेतकर्यांना प्रोत्साहन देणारा असून ५०००० रुपयाची रकम ..या आर्थिक वर्षात देणार आहे .तसेच भूविकास बँकेच्या कर्जदार शेतकर्यांनाची कर्जमाफी,व  कृषी योजना मध्ये महिला साठी ३०% असलेली तरतूदेत वाढ करून ५०% करण्यात आलेली आहे . अश्या प्रकारचा अर्थसंकल्प अजित पवार यांनी सादर केलेला आहे . हा अर्थसंकल्प शेतकर्यांनाच्या हिताचा असल्याचा जिल्हा परिषद सदस्य सलील देशमूख यांनी सांगितले .

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close