नागपुरात चपला मारो आंदोलन’ करत निषेध नोंदवला.

हर्षवर्धन सपकाल यांनी टीपू सुल्तान आणि छत्रपति शिवाजी महाराज यांच्यात केलेल्या तुलनेमुळे राज्याच्या राजकारणात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या वक्तव्याच्या निषेधार्थ रविवारी नागपूर येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाने आक्रमक आंदोलन छेडले आणि ‘चप्पल मारो आंदोलन’ करत निषेध नोंदवला.

नागपूरमधील महाल परिसरातील गांधी गेटजवळ, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य प्रतिमा उभारलेली आहे, त्या ठिकाणी मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते जमले होते. आंदोलकांनी हर्षवर्धन सपकाल यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच संताप व्यक्त करण्यासाठी त्यांच्या छायाचित्रांवर चप्पल फेकून निषेध करण्यात आला.
भाजप कार्यकर्ते व नेत्यांचा आरोप आहे की, अशा प्रकारची तुलना करून सपकाल यांनी इतिहासाचा विपर्यास केला असून कोट्यवधी हिंदू आणि शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत.
या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी कठोर भूमिका घेत सपकाल यांनी संपूर्ण महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली. तसेच, जोपर्यंत ते माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना नागपूर शहरात प्रवेश करू दिला जाणार नाही, असा इशाराही भाजप नेत्यांनी दिला.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close