
तिथे नेमकं काय घडलं ?बॉससोबत ते दोघे मस्त पार्टी करत होते, क्षणात सगळा विचका झाला
त्या रात्री काय घडलं ?पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी ही घटना घडली. अरमान (25) आणि इलियास खान (40) हे दोघे मित्र एका केटरिंग कंपनीत काम करायचे. त्यांनी त्यांचा बॉस अनिल मधुकर (50) यांच्याकडून काही पैसे घेतले आणि त्याच पैशांतून ते तिघेही पार्टी करत होते. खाण-पिणं सगळंच सुरू होतं. त्यांनी थोडं मद्यपानही केलं होतं.पार्टी रंगात आली होती. मात्र बोलता-बोलता अचानक अरमान आणि इलियास या दोघांमध्ये जुन्या कुठल्या तरी वादाचा संदर्भ निघाला आणि तो वाद पुन्हा सुरू झाला. बघता बघता त्यांचं भांडण पुन्हा पेटलं आणि दोघेही हमरी-तुमरीवर आले. दुसऱ्या क्षणी काय झालं माहीत नाही पण संतापलेल्या अरमानने तेथील चाकू उचलून इलियास याच्या गळ्यावर थेट वार केला. तो अचानक खाली कोसळला. बराच रक्तत्रावही झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. रागाच्या भरात आपण काय करून बसलो हे अरमानच्या लक्षात तर आले पण तोपर्यंत खूपच उशीर झाला होता. इलियासचा जीव गेला होता. हे पाहून अरमान तेथून तातडीने फरार झाला.या प्रकारामुळे धास्तावलेल्या अनिल कुमार यांनी कशीबशी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. आणि मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू घेण्यात येत आहे.


