काटोल मतदारसंघात सत्तासंघर्षाची रंगत; भाजप–शेकाप–राष्ट्रवादीत मोठे उलथापालथी

काटोल मतदारसंघात सत्तासंघर्षाची रंगत; भाजप–शेकाप–राष्ट्रवादीत मोठे उलथापालथी

 

काटोल मतदारसंघात नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये राजकीय चित्र पूर्णपणे बदलले असून, राज्यभराचे लक्ष वेधून घेणारे निकाल समोर आले आहेत. एकीकडे भाजपने अनेक ठिकाणी एकहाती सत्ता प्रस्थापित केली असताना, दुसरीकडे काटोल शहरात शेतकरी कामगार पक्षाने (शेकाप) भाजपला जोरदार धक्का दिला आहे.

काटोलमध्ये शेकापचा झेंडा, भाजपला धक्का
महाराष्ट्राच्या नजरा लागलेल्या काटोल मतदारसंघात भाजपच्या आमदाराला शेकापने जोरदार धक्का दिला आहे. शेकाप पक्षाच्या अर्चना राहुल देशमुख यांनी दणदणीत विजय मिळवत भाजपचा बालेकिल्ला हादरवला. या विजयामुळे काटोल शहरात शेकापचा झेंडा फडकू लागला असून भाजपला मोठी नामुष्की पत्करावी लागली आहे.
भाजपचे प्रभावी नेते समीर उमप यांना या निकालामुळे राजकीय प्रभावाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पत्नी कल्पना समीर उमप यांचा तब्बल 2050 मतांनी पराभव झाला असून हा पराभव भाजपसाठी धक्कादायक मानला जात आहे.
मोवाड नगरपंचायतीत भाजपची एकहाती सत्ता
मोवाड नगरपंचायतीत मात्र भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. भाजपच्या दर्शना ढोरे यांनी विजय मिळवत नगराध्यक्षपदावर दावा सांगितला आहे. विशेष म्हणजे भाजपने 18 जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता स्थापन केली असून राष्ट्रवादी काँग्रेसचा अक्षरशः सफाया झाला आहे.
नरखेडमध्ये भाजपचा दबदबा कायम
नरखेड नगरपरिषदेवरही भाजपने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. भाजपचे मनोज कोरडे अध्यक्षपदी निवडून आले असून, भाजपने 17 जागा जिंकत विरोधकांचा पूर्णपणे पराभव केला आहे. या निकालामुळे नरखेडमध्ये भाजपची पकड अधिक मजबूत झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोंढाळी नगरपंचायतीत योगेश चाफले विजयी
कोंढाळी नगरपंचायतीत भाजप समर्थित योगेश चाफले यांनी विजय मिळवला आहे. येथील निकालामुळे परिसरातील स्थानिक राजकारणात भाजप समर्थकांची ताकद वाढली आहे.
राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता
एकूणच काटोल मतदारसंघात भाजप आणि शेकाप यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात भाजपने वर्चस्व राखले असले, तरी काटोल शहरात शेकापने मिळवलेला विजय आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
या निकालांमुळे विदर्भाच्या राजकारणात नवे समीकरण तयार होणार असून, येत्या काळात सर्वच पक्षांची रणनीती बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे

*काटोल नगरपरिषद निवडणूक २०२५ निकाल*

*नगराध्यक्ष पदासाठी शेकाप च्या अर्चनाताई राहुलभाऊ देशमुख विजयी झाल्या आहे*
1)अर्चना राहुल देशमुख १२४३७मते
2)कल्पना समीर उमप – १०१४२ मते

*प्रभाग क्रमांक १*
1.लता कडु (भाजप)
2.भुषण भोयर (भाजप)

*प्रभाग क्रमांक २*
1.शितल राऊत (भाजप)
2.प्रमोद धुर्वे (भाजप)

*प्रभाग क्रमांक ३*
1.हर्षा खंते (शेकाप)
2.सुरेंद्र लोही (शेकाप)

*प्रभाग क्रमांक ४*
1.प्रज्ञा डोंगरे (शेकाप)
2.संदीप वंजारी (शेकाप)

*प्रभाग क्रमांक ५*
1.जयश्री सावरकर (राष्ट्रवादी श.प.)
2.राजु अडागळे (शेकाप)

*प्रभाग क्रमांक ६*
1.ज्योती चरडे (शेकाप)
2.लतेश जोगेकर (शेकाप)

*प्रभाग क्रमांक ७*
1.माधुरी चरडे (भाजप)
2.मनिष सावल (भाजप)

*प्रभाग क्रमांक ८*
1.अभिश्री जोगेकर (शेकाप)
2.अमित काकडे (राष्ट्रवादी श.प.)

*प्रभाग क्रमांक ९*
1.शकुन मडावी (भाजप)
2.सुभाष कोठे (भाजप)

*प्रभाग क्रंमाक १०*
1.सुलक्ष्मी घोडे (भाजप)
2.विजय महाजन (भाजप)

*प्रभाग क्रमांक ११*
1.रेखा उके (भाजप)
2.गणेश चन्ने (राष्ट्रवादी श.प.)

*प्रभाग क्रमांक १२*
1.वैशाली ठाकुर (भाजप)
2.वनिता रेवतकर (भाजप)
3.महेन्द्र (लहानु) गायकवाड (शेकाप)

भाजप -१३
शेकाप-०९
राष्ट्रवादी श.प.-०३

.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close