
“मैं स्वयं उसको मार डालूंगा”, जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर जगद्गुरु परमहंस आचार्य महाराज संतापले
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. श्रीराम मांसाहारी होते, असे वक्तव्य शिर्डीत त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. संत महात्मांनीही त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अयोध्या येथील जगद्गुरु श्री श्री 1008 जगद्गुरु परमहंस आचार्य महाराज प्रचंड संतापले आहेत. त्यांनी आपण स्वंय जितेंद्र आव्हाड यांचा वध करणार असल्याचे वक्तव्य केले आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याविरोधात आंदोलन सुरु आहे.राज सरकार आणि केंद्र सरकार मिळून जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करावी. सरकार कारवाई करणार नसेल तर “मैं स्वयं उसको मार डालूंगा, हमे चाहे फासी होने दो, संत समाज डरता नही है, इस तरह से अकबर के भक्तो को खुश करने की कोशिश की जा रही है,” असे त्यांनी म्हटले आहे. जितेंद्र आव्हाड यांना संत समाज माफ करणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
हनुमान गढीचे महंत राजुदासजी महाराज यांनी मोठे वक्तव्य केले आहे. जितेंद्र आव्हाड हे राक्षसी प्रवृत्तीचे आहेत. त्यांना चप्पलाच हार घालून पक्षातून हाकलून द्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर कारवाई करावी. जितेंद्र आव्हड जिथे जातील तिथे हिंदू त्यांना चपलाचा हार घालतील. उद्धव ठाकरे यांनी रामद्रोही असणाऱ्या या पक्षासोबत सरकार बनवले. त्यांनी महापाप केले आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षाचं नाव, चिन्ह, फंड त्यांच्याकडून गेले. आता ते विरोधी पक्षाच्या क्षमतेचे राहिले नाहीत. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची मानसिकता काही कळत नाही. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या वडिलांच्या विचारांपासून फारकत घेतली आहे.
Live Cricket
Live Share Market
