काटोल, नरखेड आणि मोवाड येथे भव्य दिवाळी मनोमील सोहळा संपन्न

काटोल, नरखेड आणि मोवाड येथे भव्य दिवाळी मनोमील सोहळा संपन्न

काटोल, नरखेड, मोवाड परिसरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने दिवाळी मनोमील सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांना स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.

या सोहळ्यादरम्यान कार्यकर्त्यांना संघटित राहून एकजुटीने काम करण्याचे आवाहन केलें. तर पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे आणि योग्य पद्धतीने पार पाडून, आगामी निवडणुकांसाठी तयारी करण्याचे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे पदाधिकाऱ्यांनी दिले.

नगर परिषद आणि जिल्हा परिषद निवडणुका लक्षात घेता प्रत्येक कार्यकर्त्याने जनतेशी संपर्क वाढवावा, पक्षाच्या धोरणांची माहिती घराघरांत पोहोचवावी, आणि पक्षाच्या विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.

नेत्यांनी यावेळी सांगितले की, “भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केलेल्या विकासकामांमुळे आणि लोकहिताच्या निर्णयांमुळे आज जनतेचा विश्वास भाजपावर दृढ आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये विजय निश्चित आहे.”

तसेच, काँग्रेस पक्षात संघटनाचा अभाव असल्याने दररोज शेकडो कार्यकर्ते काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत, हे पक्षशक्तीचे प्रतीक असल्याचेही नेत्यांनी नमूद केले.यावेळी मंचावर आमदार चरणसिंग ठाकूर अन्य पदाधिकारी उपस्थित होते

कार्यक्रमादरम्यान कार्यकर्त्यांमध्ये दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या आणि संघटन मजबूत ठेवण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला. या प्रसंगी अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close