वडिलांचा कॉल ने घेतला मजुराचा बळी

वडिलांचा कॉल ने घेतला मजुराचा बळी
विदर्भ दर्पण news: थ्रेशर मध्ये मळणी करीत असताना मजुराचा मृत्यू झाल्याची घटना कामठी तालुक्यातील लिहगाव गाव येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यू ची नोद केली आहे.हरभऱ्याच्या पिकाची थ्रेशर मशीन मध्ये मळणी करीत असतांना मजुरा ला मोबाईल फोनवरून कॉल आला आणि तो फोन वर बोलत असतांना मशीन मध्ये कापणी केलेले हरभऱ्याची पिक टाकलत होता त्यावेळी हात मशीन मध्ये अडकला आणि गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला ही घटना कामठी नवीन पोलीस ठाण्याचे हद्दीतील लेहगाव शिवारात बुधवारी तीन वाजताच्या सुमारास घडली.साहिल सुरज देशमुख 25 दिघोरी तालुका ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर असे मृताचे नाव आहे. मशीनवर मजूर म्हणून काम करायचा अशोक बालाजी दुधस राहणार लिहगाव तालुका कामठी यांनी नुकतीच आपल्या शेतात हरभऱ्याच्या पिकाची कापणी केली आणि बुधवारी मशीनद्वारे मळणी ला सुरुवात केली मळणी साठी बोलावलेल्या अरविंद सांबरे यांच्या मालकी च्या थ्रेशर मशीन वर साहिल मजूर म्हणून कामाला गेला होता. मशीनमध्ये वाळलेले हरभऱ्याचे पीक टाकत असतांना मोबाईलवर वडिलांचा कॉल आला तो एकीकडे फोनवर वडिलांचे बोलत होता तर दुसरीकडे एका हाताने हरभऱ्याच्या मशीन मध्ये टाकला होता पण त्याचा हात चालू मशीन मध्ये गेला आणि तो आत खेचला गेला आणि गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी कामठी नवीन पोलिसांनी साहिलच्या सहकारी मनोज बिहारी दिघारे राहणार दिघोरी तालुका ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर यांच्या तक्रारीवरून अकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपास पोलीस निरीक्षक तपास करीत आहे.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close