शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार

पुणे स्वारगेट बस स्थानकात उभ्या असलेल्या एका शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर स्वारगेट बलात्कार केल्यानंतर आरोपीने पीडितेला जीवेमारण्याची धमकी दिली आणि तो फरार झाला. 72 तासात पोलिसांनी आरोपीला बेड्या ठेकल्या 37 वर्षीय आरोपी दत्तात्रय रामदास गाडे याला शिरूर, पुणे येथून अटक करण्यात आली आहे.
दत्तात्रय रामदास गाडे याने केलेला बलात्काराचा पहिला गुन्हा नाही. याआधी देखील त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांना दत्तात्रय रामदास गाडे याचे आई – वडील आणि गर्लफ्रेंडची देखील चौकशी केली आहे. चौकशीत आरोपचीच्या गर्लफ्रेंडने धक्कादायक खुलासा केला आहे.
आरोपीची गर्लफ्रेंड म्हणाली, ‘दत्तात्रय रामदास गाडे त्याने अनेक तरुणींना त्रास दिला आहे असा धक्कादायक खुलासा आरोपीच्या गर्लफ्रेंडने केला आहे.
मिळालेल्या माहितीनूसार, आरोपी गाडे याच्यावर यापूर्वी चोरी, दरोडा, चेन स्नॅचिंग यांसारखे गुन्हे दाखल आहेत. 2019 मध्ये एका गुन्ह्यात आरोपीची जामिनावर सुटका झाली होती. आता बलात्कार प्रकरणी आरोपील अटक झाली असून शुक्रवारी पुणे न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची देखील माहिती मिळत आहे.
पुणे अत्याचार प्रकरणात 40 जणांची चौकशी करण्यात आली आहे. एवढंच नाही तर, आरोपीची माहिती देणाऱ्याला 1 लाख रुपयांचं बक्षिस देखील घोषित करण्यात आलं होतं. अखेर आरोपी दत्तात्रय गाडे हा ऊसाच्या शेतामध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली. त्यानंतर पोलिसांनी रात्री दीडच्या सुमारास आरोपीला बेड्या ठोकल्या.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close