
काटोल ला मराठी भाषा गौरव दिन संपन्न
काटोल प्रतिनिधी : नबीरा महाविद्यालय काटोल येथे मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन दि.२७ फेब्रुवारी,२०२५ काटोल येथील नबीरा महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने दि.२७ फेब्रुवारी, २०२५ रोजी मराठी भाषा गौरव दिन अर्थात ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी साहित्यिक कुसुमाग्रज उर्फ वि.वा. शिरवाडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कुसुमाग्रज यांच्या साहित्यिक आणि सामाजिक कार्याला अभिवादन करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विकास बारसागडे सर उपस्थित होते. मराठी विभागाच्या प्रमुख डॉ. रिता पाठक तर कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. भारत कडबे उपस्थित होते. डॉ. विकास बारसागडे यांनी कुसुमाग्रज यांच्या साहित्यावर प्रकाश टाकला. डॉ. रीता पाठक मॅडम यांनी कुसुमाग्रजांच्या कवितांचा आढावा घेतला. तर कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. भारत कडबे यांनी कुसुमाग्रज यांच्या कविता, कथा, कादंबरी, नाटक, एकांकिका यावर महत्वपूर्ण माहिती दिली तसेच कुसुमाग्रजांच्या कवितांचे सादरीकरण केले.यावेळी पंधरा विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रजांवरील आणि स्वलिखित कवितांचे वाचन केले. यावेळी ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचे पारितोषिक आणि प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. ‘मराठी भाषा व रोजगाराच्या संधी’ आणि ‘अभिजात मराठी भाषा’ या विषयावर ही निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती. या निबंध स्पर्धेत चाळीस विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविलेला होता. याप्रसंगी स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक कु.देवयानी ताथोडे (बी.ए. तृतीय वर्ष) हिने प्राप्त केला. तिला पाचशे रुपये रोख व प्रमाणपत्र देण्यात आले. तर द्वितीय क्रमांक रणजीत शेंडे (बी.ए.द्वितीय वर्ष)याला तीनशे रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात आले. तृतीय पुरस्कार कु.निकिता दातर (बी.कॉम.अंतिम वर्ष) हिला प्राप्त झाला.तिला दोनशे रुपयाचे बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विविध विभागातील विद्यार्थी व प्राध्यापक हजर होते. डॉ. प्रमोद सलामे,डॉ. भारत वालोंद्रे,प्रा. शिवचरण बेहनिया, प्रा. अविनाश भक्ते, डॉ.चंदू देशपांडे, प्रा. शिशिर कळंबे, प्रा. गुरुदास नेहारे , प्रा.चेतन राठोड, डॉ. राऊत मॅडम, डॉ. बारबुद्धे मॅडम, प्रा. सायवानकर सर, प्रा.मनीष लाड, प्रा. हर्षा हेलोंढे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन डॉ. भारत कडबे यांनी तर आभार प्रा. विनोद वंजारी यांनी केले.
