
न.प. अभ्यास केंद्रामधे एमपीएससी च्या सराव परिक्षा झाल्या सुरू
न. प. अभ्यास केंद्रामधे एमपीएससी च्या सराव परिक्षा झाल्या सुरू
(काटोल प्रतीनीधी): नगरपरिषद काटोल अंतर्गत कुंतलापूर ज्ञानार्जन केंद्र मधील विद्यार्थ्यां करता एमपीएससी मार्गदर्शना सोबतच आज एमपीएससी च्या विद्यार्थ्यां करिता सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी नगरपरिषद काटोल मा. श्री धनंजय धनंजयजी बोरीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व ग्रामीण विद्यार्थी व शहराच्या तुलनेत कुठेही मागे पडू नये म्हणून या सराव परीक्षेचे आयोजन केंद्रामध्ये करण्यात आलेले आहे. यासोबतच पुढील काळात बँकिंग ,पोलीस भरती तथा इतरही परीक्षांचे मार्गदर्शन तथा सराव परीक्षा घेण्यात येणार असल्याचे कर्तव्यदक्ष ग्रंथपाल श्री राजूभाऊ राऊत यांनी आपला मानस व्यक्त केलेला आहे .
यावेळी ग्रंथपाल श्री राजू राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास ५०विद्यार्थ्यांनी एमपीएससी सराव परीक्षेत भाग घेतला आहे .
माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान आमदार श्री चरणसिंगजी ठाकूर यांच्या पुढाकारातून हे कुंतलापूर ज्ञानार्जन केंद्र स्थापन करण्यात आलेले असून या ठिकाणी 466 विद्यार्थ्यापेक्षा जास्त विद्यार्थी इथे रोज अभ्यास करीत आहे आणि ग्रंथालायाचे फलित म्हणून गेल्या दोन वर्षांमध्ये 300 पेक्षा जास्त विद्यार्थी शासकीय नोकरीत तथा निमशासकीय कार्यालयामध्ये उच्चस्तरीय पदावर निवड झालेली असल्याबद्दल मा. सभापती संजय डांगोरे यांनी विद्यार्थी आणि ग्रंथपाल राजाभाऊ राऊत यांचे अभिनंदन केले.
