
.जगदंबा विद्यालय येथे स्वातंत्र्यदिन संपन्न
विदर्भ दर्पण news :१५आॕगस्ट ७७ वा स्वातंत्र्यदिनाचा सुंदर सोहळा जगदंबा मा.विद्यालय मोवाड येथे थाटामाटात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून सौ. लताताई साठोणे माजी न.प.उपाध्यक्षा मोवाड यांच्या हस्ते ध्वजारोहन झाले .प्रमुख अतिथी म्हणून मा.कार्याध्यक्ष वसंतराव साठोणे , व सौ.सीमाताई बागडे माजी नगराध्यक्षा न.प.मोवाड ,किंडर गार्डन कान्व्हेंनचे संचालक श्री.अधिरबाबू साठोणे हे होते.कार्यक्रमाचे .मुख्याध्यापिका सौ.उज्वला गायधणे (साठोणे)यांनी केले .विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतेसादर केली.भाषणातून देशाला स्वातंत्र्य कसे प्राप्त झाले हे सांगितले .कार्यक्रमाच्या अध्यक्षायांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी किती हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या व शूर वीरांनी किती प्राणांची आहुती दिली .आणि भारतीय नागरिकांचे काय कर्तव्ये देशाप्रती आहे हे सांगितले .शिक्षिका सुषमा कळंबे यांनी झेंडा सलामी दिली. कार्यक्रमाला भारतीय सिमेवरील जवान किशोर राजगुरू व गावातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका वंदना निकोसे ,जयश्री बांदरे आरती देवते,दिपाली बानाईत ,माधुरी मानेकर ,प्रीती कोरडे,रघूनाथ कळंबे ,नितेश पराते लता हेडाऊ यांनी सहकार्य केले असून सुञसंचालन ज्योती पांगुळ (बन्सोड) यांनी केले असून आभार आरती देवते यांनी मानले.



