कुरिअरवाला बनून ‘नको ते उद्योग’ करणाऱ्याला विकृताला अटक,

नागपूर | कुरिअरवाला बनून आला आणि नको ते उद्योग…शैलेश भुजराज यादव असे विकृत आरोपीचे नाव असून त्याने पुन्हा एकदा एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्याचे समोर आल्यानतंर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. आरोपी शैलेश हा नागपूरच्या धंतोली परिसरात एका इमारतीत उभा होता. तेवढ्यात शाळेतून परत येणारी एक अल्पवयीन मुलगी इमारतीत शिरल्यावर त्याला दिसली. कुरिअरवाला असल्याचे सांगसोबत त त्याने त्या अल्पवयीन मुलीला हाक मारली. मात्र ती मुलगी जवळ आल्यावर त्याने तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला.

याप्रकारामुळे भेदरलेल्या त्या मुलीने जोरात आरडाओरडा करत मदत मागण्याचा प्रयत्न केला असता, आरोपी तेथून फरार झाला. पीडित मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसांत जाऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. पोलिसांनी संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये त्यांना आरोपी गाडीवरून आलेला दिसला, त्याच्या गाडीच्या नंबर वरून त्याचा शोध घेतला. आरोपी हा एका इलेक्ट्रॉनिकच्या दुकानात एसी तसेच लॅपटॉप दुरुस्तीचे काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याला अटक करत त्याची संपूर्ण पार्श्वभूमी शोधली असता तो सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले. आत्तापर्यंत त्याने अनेक अल्पवयीन मुलींची छेड काढली असून वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरोधात गुन्हे. एका प्रकरणात त्याला शिक्षासुद्धा सुनावण्यात आली होती, मात्र तरीही त्याने त्याचं विकृत कृत्य सुरूच असल्याचं उघड झालं. पोलिसांनी त्याच्यावर पोक्सो अंतर्गत कारवाई करत त्याला अटक केली असून पुढील तपास करत आहेत.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close